बारामती : एका मुलीच्या बापाचं जगणं वेगळंच असतं, एकच मुलगी असल्याने अनेक गोष्टी ऐकाव्या लागतात, असं शरद पवार (Sharad Pawar) यांनी सांगितलं आहे. शरद पवार म्हणाले की, सुप्रिया सुळे (Supriya Sule) त्यांच्या मुलांसाठी लंडनला गेल्या आहेत, म्हणून त्या इथं येऊ शकल्या नाहीत. मी मुलीचा बाप म्हणून इथं उपस्थित आहे. इथे एकच मुली असलेले बाप कोण आहेत? असा प्रश्न त्यांनी विचारला यावर अनेकांचे हात वर येताच इतके असतील तर आपण आपला एक वेगळा ग्रुप करू, असंही पवारांनी म्हटलं आहे.
एकच मुलगी असलेल्या बापाला अनेक गोष्टी त्यांना ऐकाव्या लागतात
माझी मुलगी इथे हजर नाही, पण बापाचंच कौतुक चाललेलं आहे. मला माहित नाही तुमच्यामधे एकच मुलगी असलेले किती जण आहेत. एकच मुलगी ज्या बापाला असते, त्यांचं जीणं एक वेगळंच असतं. अनेक गोष्टी त्यांना ऐकाव्याचं लागतात. बारामतीमध्ये आयोजित डॉक्टरांच्या कार्यक्रमात सभेला संबोधित करताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
मोदी आणि माझे संबंध चांगले होते, पण...
मोदी आणि माझे संबंध चांगले होते, पण कालांतराने त्यांनी मर्यादा सोडली, असं शरद पवारांनी म्हटलं आहे. नरेंद्र मोदी यांच्यासोबत माझे चांगले संबंध होते. बारामतीमध्ये ते आले होते, बारामतीमध्ये येऊन त्यांनी भाषण केलं होतं. मुख्यमंत्री असताना अमेरिकेने त्यांचा व्हिसा नाकारला होता. त्याच्यानंतरच्या काळात ते पंतप्रधान झाले. सुसंवाद होता आमचा, पण नंतर ज्या मर्यादा सांभाळल्या पाहिजेत, त्या त्यांनी कितपत सांभाळल्या, याचा विचार नागरिकांनी केला पाहिजे, असंही पवारांनी म्हटलं आहे.
पाहा व्हिडीओ :
महत्त्वाच्या इतर बातम्या :