बारामती : मंदिर आणि मशिदीवर धार्मिक राजकारण केल्यास लोक निवडणून देत नाहीत, हे या निवडणुकीत लोकांनी दाखवून दिलं आहे, असं म्हणत शरद पवार (Sharad Pawar) यांनी भाजपसह (BJP) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. बारामतीत पार पडलेल्या डॉक्टर मेळाव्यात शरद पवार यांनी हे वक्तव्य केलं आहे.


या निवडणुकीत लोकांनी दाखवून दिलंय


निवडणूका झाल्या आहेत. यंदाची निवडणूक माझ्या दृष्टीने वेगळी होती. 1967 साली मी पाहिल्यांदा उभा राहिलो होतो, तेव्हापासून आजपर्यंत अनेक निवडणूक मी लढलो. मी 14 निवडणुकीमध्ये निवडून आलो. निवडणूकीच तरतम्य मी अनेक वर्षे अनुभवलं आहे. अनेकदा निवडणुकीत आम्ही संघर्ष केला आहे. 1970 मध्ये इंदिराजींनी आणीबाणी घोषित केली होती आणि निवडणूक लागली त्यावेळी संपूर्ण चित्राबद्दल जगामध्ये इंदिरा गांधीजींचा लौकिक होता. त्या इंदिराजींचा पराभव त्या निवडणुकीत त्यांचं पराभव झाला, असं पवारांनी यावेळी नमूद केलं आहे.


धार्मिक राजकारण केल्यास जनता मत देत नाहीत


यावेळी शरद पवारांनी मोदींवर निशाणा साधताना म्हटलं आहे की, लोक शहाणे आहेत, राज्यकर्त्यांनी देशहिताचे निर्णय घेतले नाहीत तर लोक निर्णय घेत असतात. लोक स्वतःहून कधी रिअॅक्ट होत नाहीत, पण निवडणूक झाली की लोक व्यक्त होतात. या निवडणुकीत लोकांनी दाखवून दिले की, मंदिर आणि मशिदीवर धार्मिक राजकारण करण्याचा प्रयत्न कुणी केला तर, लोक निवडणून देत नाहीत. मोदी की गॅरंटी, मोदी हे तो मुंकीन है, म्हणत संपूर्ण देशात वातावरण निर्माण केलं गेलं.


डॉक्टरांवर होणारे हल्ले हा चिंतेचा विषय


आम्हाला संसदेचा सन्मान ठेवला पाहिजे. काहीवेळा गोंधळ होतो. डॉक्टरांचे प्रश्न आहेत. डॉक्टरांवर होणारे हल्ले हा चिंतेचा विषय आहे. त्यासंबंधी आपल्याला निर्णय घ्यावे लागतील. आम्ही तुमचं म्हणणं संसदेत मांडू ही आमची जबाबदारी राहील, असंही शरद पवारांनी म्हटलं आहे.


पाहा व्हिडीओ :



महत्त्वाच्या इतर बातम्या :


एकच मुलगी असलेल्या बापाला अनेक गोष्टी ऐकाव्या लागतात : शरद पवार