पुणेबारामती कुणाची? (Baramati Lok Sabha Election)  मोठ्या साहेबांची की अजितदादांची?  राज्यातील सर्वाधिक प्रतिष्ठेची लढाई ही सुप्रिया सुळेंनी जिंकली आणि बारामती ही शरद पवारांची (Sharad Pawar) यावर शिक्कामोर्तब केले आहे. निकालानंतर  आता जवळपास पंधरा दिवसानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांनी  लेकीच्या विजयाचे गणित मांडले आहे. देशाचे पंतप्रधान दीड लाख मतांनी निवडून आले आहेत. तर सुप्रिया सुळे (Supriya Sule)  1 लाख 54 हजारांनी निवडून आली.देशाच्या पंतप्रधानांपेक्षा सुप्रिया सुळे जास्त मतांनी निवडून आल्या आहेत, असे शरद पवार म्हणाले. ते बारामतीत बोलत होते.


शरद पवार म्हणाले,  1967 साली मला कठीण काळात विजयी केले. सोमेश्वर कारखान्याचे बाबलाल काकडे यांच्या विरोधात मला निवडून दिलं. मी नुकताच कॉलेज जीवनातून बाहेर आलो होतो.बारामतीमधील तरुण पिढीने मला नेहमीच साथ दिली आहे. आजची निवडणूक ही सुप्रिया सुळे यांची चौथी निवडणूक असताना देखील प्रचंड मतांनी विजयी केलं. बारामतीमधील जनतेला कोणतं बटन दाबायच हे सांगावं लागत नाही. देशाचे पंतप्रधान दीड लाख मतांनी निवडून आले आणि सुप्रिया दीड लाखापेक्षा जास्त मतांनी निवडून आली. देशाच्या पंतप्रधान यांच्यापेक्षा सुप्रिया सुळे जास्त मतांनी निवडून आल्या आहेत.


शेतकरी अडचणीत कसा येईल याचा विचार मोदी  सरकार करते : शरद पवार


शेतकरी अडचणीत कसा येईल याचा विचार मोदी  सरकार करते. मोदी सरकारमधील लोक म्हणतात आम्ही खाणाऱ्या  लोकांचा विचार करतो परंतु पिकवणाऱ्याने पिकवले नाही तर खाणारा काय खाईल असा सवाल  शरद पवारांनी केला आहे.  सत्ताधाऱ्यांनी काळ्या आईशी इमान राखणाऱ्या लोकांचा विचार केला पाहिजे, असेही शरद पवार म्हणाले.  


मराठा आणि ओबीसी प्रश्नात आता केंद्र सरकारने हस्तक्षेप करण्याची गरज 


राज्यात गेल्या काही दिवसांपासून मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा तापलाय. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी हे दोन्ही मुद्दे निकालात काढण्यासाठी केंद्र सरकारने हस्तक्षेप करण्याची गरज व्यक्त केली आहे. मर्यादेबाहेर आंदोलन जाणार नाही, सामाजिक ऐक्याला धोका पोहोचणार नाही याची काळजी घ्या असं शरद पवारांनी सुनावलंय. केंद्र सरकारला या सगळ्यात निव्वळ बघ्याची भूमिका घेऊन चालणार नाही. केंद्र सरकारने पुढे येऊन या सगळ्यावर तोडगा काढला पाहिजे असं वक्तव्य यांनी केलंय. 


हे ही वाचा :


बारामतीमध्ये अजित दादांना शह? विधानसभेसाठी थोरल्या पवारांनी कंबर कसली, तीन दिवसांत अख्खी बारामती पिंजून काढणार