सातारा : शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांना अटक केली तर महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यात संघर्ष उभा करणार, असा इशारा शरद पवारांनी सातारा जिल्ह्यातील सभेत दिलाय. तसेच शशिकांत शिंदेंना निवडणुकीत थांबवण्याचे प्रयत्न सुरु असल्याचंही शरद पवार म्हणाले आहेत. आता तिसरा कधी येतोय बघू. ही निवडणूक पूर्णपणे त्यांच्या हातून गेल्यामुळे ते देशात जे राजकारण करतात, तेच माझ्यासोबत करत आहेत, अशी प्रतिक्रिया शशिकांत शिंदे यांनी दिली आहे.


शशिकांत शिंदेंना अटक केली तर महाराष्ट्रात...


शशिकांत शिंदेवर गुन्हा नोंदवला आहे. ज्या समितीमध्ये ते काम करत होते, काही ना काही करुन त्यांना अडकवायचं कसं? या निवडणुकीत शशिकांत शिंदेंना थांबवायचं कसं? हे सूत्र इतकं धोक्याचं आहे, त्यामुळे त्यांच्यावर खटला दाखल केला. महाराष्ट्रात प्रत्येक तालुक्यात संयमाने,  लोकशाहीच्या माध्यमानं संघर्ष केल्याशिवाय राहणार नाही. हा अन्याय आणि अत्याचार महाराष्ट्र सहन करणार नाही, हे उदाहरण दाखवल्याशिवाय राहणार नाही. 


शरद पवारांची पंतप्रधान मोदींवर टीका


शरद पवार म्हणाले, सातारा जिल्हा देशाचा आगळा वेगळा जिल्हा आहे, ह्या जिल्ह्यातील लोकांनी स्वातंत्र्यासाठी लढा दिला आहे. यशवंतराव चव्हाण यांना भारत भूषण दया अशी मागणी होतं आहे. आनंद आहे पण यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान ही संस्था आहे. चव्हाण यांचं स्मारक मुंबईत आहे संसदेतही चव्हाण यांचा फोटो आहे. अशा अनेक गोष्टी चव्हाण यांच्या कार्याची नोंद व्हावी यासाठी केल्या आहेत पण हा विषय निवडणुकीचा मुद्दा म्हणून आम्ही केला नाही. मोदींच्या राज्यात महागाई वाढली. भारतात 100 पैकी 87 तरुणांना काम नाही. स्वतः काही केलं ते मोदी सांगत नाहीत, असं म्हणत शरद पवारांनी भाजप सरकार आणि मोदीवर निशाणा साधला आहे.


निवडणूक हातून गेल्यामुळे राजकारण सुरु : शशिकांत शिंदे


आणखी तिसरा गुन्हा कधी दाखल होतोय, याची वाट पाहात आहे, ही निवडणूक त्यांच्या हातातून गेल्यामुळे हे प्रयत्न सुरु आहेत, अशी प्रतिक्रिया शशिकांत शिंदे यांनी दिली आहे. ज्याचा एफएसआय वाटला नाही, ज्याचा एफएसआय अजूनही बाजार समितीच्या ताब्यात आहे, वाटप करताना ठेवलेल्या धोरणांवर आम्हाला क्लिनचीट दिलेली आहे, फक्त या दराने तुम्ही वसूल करा, अशी सूचना दिलेली आहे. आता काय आहे, पहिला झाला, दुसरा झाला, आता तिसरा कधी येतोय बघू. ही निवडणूक पूर्णपणे त्यांच्या हातून गेल्यामुळे ते देशात जे राजकारण करतात, तेच माझ्यासोबत करत आहेत, असं शशिकांत शिंदे यांनी म्हटलं आहे.


पाहा व्हिडीओ : शशिकांत शिंदेंना अटक केली तर संघर्ष उभा करणार, शरद पवार नेमकं काय म्हणाले?



महत्त्वाच्या इतर बातम्या :


मोठी बातमी : साताऱ्याचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्यावर गुन्हा, कोणत्याही क्षणी अटकेची शक्यता