रत्नागिरी : शिवसेना (Shiv Sena) ठाकरे गटाचे (Thackeray Group) आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांची पुन्हा एकदा केंद्रीय गृहमंत्री आणि महायुतीचे स्टार प्रचारक अमित शाह (Amit Shah) यांच्यावर कडक शब्दात टीका केली आहे. भास्कर जाधव म्हणाले, अमित शाह हे गब्बर सिंग तर योगी आदित्यनाथ (Yogi Aditynath) यांनाही केलं टीकेचं लक्ष्य केलं. भास्कर जाधव (Bhaskar Jadhav)यांनी अमित शाह (Amit Shah) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांची मिमिक्री (Mimicry) केली आहे. अमित शाह आणि योगी आदित्यनाथ (UP CM Yogi Aditynath) यांच्या रत्नागिरी दौऱ्याच्या (Ratnagiri Tour) पार्श्वभूमीवर भास्कर जाधव यांनी जोरदार टीकास्त्र डागलं आहे. 


विनायक राऊत कोकणातील खाशाबा जाधव 


विनायक राऊत यांच्या दिसण्यावर जाऊ नका, ते कोकणातील कुस्तीपटू खाशाबा जाधव आहेत. अमित शाह आणि योगी आदित्यनाथ यांना कोकणातील लात मातीत चितपट केल्याशिवाय राहणार नाहीत, असं भास्कर जाधव यांनी म्हटलं आहे. चाळीस वर्षे राजकारणात आहे, एकही भ्रष्टाचाराचा आरोप नाही, असं म्हणत चिपळूणमधील गोवळकोट येथील सभेत भास्कर जाधव कडाडले.


भास्कर जाधवांकडून अमित शाहांची मिमिक्री


महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचाराला योगी आदित्यानाथ येणार आहेत, ते भगवी कापडं घालतात, त्यांची उंची फार मोठी आहे. हा माणूस  5-25 हजार गुंड पाळून असतो, हा साधू, हा बुवा, तो विनायक राऊतांच्या विरोधात प्रचाराला येणार आहे आणि महाराष्ट्राचा गब्बर सिंग अमित शाह. गब्बर सिंगचं वाटतो की नाय, असं म्हणत भास्कर जाधवांनी अमित शाहांची मिमिक्री केली. गेल्या वर्षी विनायक राऊतांच्या तब्येतीवरून टिंगल-टवाळी केली होती. पण, विनायक राऊतांच्या तब्येतीवर जाऊ नका, हा वाटतो तितका हलका नाही, असं म्हणत भास्कर जाधवांनी महायुतीवर जोरदार निशाणा डागला आहे.


मुख्यमंत्र्यांची मिमिक्री, अजित पवारांवरही निशाणा


भास्कर जाधव यावेळी म्हणाले, तुम्ही विधानसभेत माझी भाषण बघता की नाही, समोर एकनाथराव शिंदे बसलेले असतात, असं म्हणत त्यांनी दाढीवरून हात फिरवत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मिमिक्री केली. विधानसभेत माझं भाषण सुरु असताना समोर एकनाथ शिंदे मान खाली घालून असतात, डोकं वरही काढत नाहीत, त्यांच्या बाजूला अजित पवार तेही मान खाली घालून असतात, असं भास्कर जाधव यांनी म्हटलं आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


मोठी बातमी : बाळासाहेबांचा मुलगा काँग्रेसला मतदान करणार हे दुर्दैव, एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर तोफ डागली