एक्स्प्लोर

अजित पवारांच्या दमदाटी भाषणावर शरद पवारांचा पहिल्यांदाच थेट हल्ला; बारामतीतून 'करेक्ट कार्यक्रम'ची आठवण

गेले काही वर्ष या भागाचे प्रश्न असतील ते दुसऱ्यावर टाकले होते,आणि मी राज्य आणि देश पातळीवर काम करण्यासाठी वेळ घालवला.

पुणे : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर शरद पवार यांचे बारामती दौरे वाढल्याचं पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी बारामतीमधील (Baramati) व्यापाऱ्यांच्या मेळाव्यात उपस्थिती दर्शवत बारामतीच्या विकासासाठी वेळ पडल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदींचीही भेट घ्यायला मागेपुढे पाहणार असल्याचं शरद पवार (Sharad Pawar) यांनी म्हटलं होतं. त्यानंतर, आज बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर गावात पोहोचले असून तेथील ग्रामस्थांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी, नाव न घेता अजित पवारांना लक्ष्य केलं. तसेच, लोकसभा निवडणुकीत येथील जनता आपल्या पाठिशी राहिली. गेल्या 57 वर्षांपासून आपण सर्वजण माझ्या पाठिशी आहात, असेही पवार यांनी म्हटले. दरम्यान, येथील भाषणातून शरद पवारांनी नाव न घेता अजित पवारांना लक्ष्य केलं. अजित पवारांनी (Ajit Pawar) निवडणूक काळात केलेल्या दमदाटीच्या भाषणावर थेट हल्लाबोल केला.  

गेले काही वर्ष या भागाचे प्रश्न असतील ते दुसऱ्यावर टाकले होते,आणि मी राज्य आणि देश पातळीवर काम करण्यासाठी वेळ घालवला. मात्र, यावेळी एक वेगळी स्थिती निर्माण झाली असून आज इकडे 10-15 लोक असे दिसत आहेत की, जे 56 वर्षांपूर्वी साथ देणारे आजही इथच आहेत. इथं अनेकजण माझ्यासोबत काम करत होते. या भागात येताना काळजी घ्यावी लागत असे, पण मी गेले 56 वर्ष निवडणूक लढलो आणि जिंकलो. पहिली निवडणूक सोपी नव्हती,कष्ट घ्यावे लागले, हा भागात नंतर तुम्ही सांभाळला, मी राज्यात फिरत होतो. नंतर तीन वेळेला लोकसभेला सुप्रिया सुळे यांना तुम्ही निवडून दिले, तर देशाच्या लोकशाहीत मलाही निवडून दिले.

यंदाची लोकसभा निवडणूक सोपी नव्हती,देशात आणि जगभर देशभर गेली. अनेकांना चिंता होती काय होईल कसं होईल, सत्ता हातात नाही, राज्याची सत्ता नाही. त्यातच, काही लोकांना फोन येऊ लागले, प्रेमाने, दमदाटीही केली, जे माहिती नव्हतं ते या निवडणुकीत पहिला मिळालं. मात्र, या निवडणुकीत लोक पुढे येतच नव्हते, न बोलणारी ही निवडणूक होती. मात्र, ज्या गावात लोक पुढे येत नव्हते, तिकडे मतदान झालं. लोक बोलत नव्हते पण त्यांना सागवा लागलं नाही आणि लोकांनी तुतारी दिल्लीला पाठवली, असे म्हणत बारामतीकरांनी न बोलता करेक्ट कार्यक्रम केल्याचं शरद पवार यांनी सूचवलं. 

दमदाटी करणाऱ्यांची नोंद मतदारांनी घेतली नाही

आता, साहजिकच लोकांच्या कामासाठी आम्हाला अधिक लक्ष घालावं लागेल. आज मोदींची सत्ता आहे, आपली सत्ता नाही, एक वेगळा विचार दाखवायला सुरुवात केली. मोदी समोर कोणी टिकणार नाही, असं बोलले. मोदींनी राज्यभर 16 सभा घेतल्या, प्रत्येक ठिकाणी माझं नाव घेतलं हे माझे भाग्य समजतो. मात्र, लोकसभा निवडणुकीत आम्ही 48 जागा लढलो आणि 31 जिंकलो, राष्ट्रवादीचे 10 पैकी 8 ठिकाणचे उमेदवार विक्रमी मतांनी जिंकून दिले. पंतप्रधान असो, मुख्यमंत्री असो, इतर कोणीही असो, दमदाटी करणाऱ्याची नोंद मतदारांनी घेतली नाही, त्यांनी आपलं मतदान योग्य ठिकाणी केले, असे म्हणत शरद पवारांनी अजित पवारांवर नाव न घेता निशाणा साधला. 

सत्ता हाती घ्यावी लागेल

आज अनेक प्रश्न आहेत,ज्यांच्याकडे सत्ता आहे त्यांनी ते सोडवले नाहीत, त्यांची जबाबदारी होती पण आता आम्हाला लक्ष घालावं लागले (हे नीट ऐकावे). बाळांनो इतके वर्ष आम्ही तुम्हाला पाठिंबा दिला, तुम्ही आमच्यासाठी काय केलं हे विचारले पाहिजे. तुमचा आम्हाला निकाल घ्यावा लागेल. सत्तेचा गैर वापर करणाऱ्याना त्यांची जागा दाखवावी लागेल. आपल्याला सत्ता बदलावी लागेल, सत्ता हातात घेतली पाहिजे, असेही शरद पवारांनी म्हटले.

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

कोण संजय राऊत? मी त्यांना ओळखत नाही, शिवराळ भाषेतील टीकेनंतर जयकुमारे गोरेंचा राऊतांना टोला 
कोण संजय राऊत? मी त्यांना ओळखत नाही, शिवराळ भाषेतील टीकेनंतर जयकुमारे गोरेंचा राऊतांना टोला 
Abhijeet Dipke : अमित शाह असताना जर परदेशातून फंडिंग होत असेल तर हे कसले चाणक्य? अभिजीत दिपकेंचा टोला
अमित शाह असताना जर परदेशातून फंडिंग होत असेल तर हे कसले चाणक्य? अभिजीत दिपकेंचा टोला
गावाची ओढ लहानपणापासूनच, मला सरपंच व्हायचं होतं पण... अभिजीत दिपकेंनी माझा कट्ट्यावर सांगितला किस्सा
गावाची ओढ लहानपणापासूनच, मला सरपंच व्हायचं होतं पण... अभिजीत दिपकेंनी माझा कट्ट्यावर सांगितला किस्सा
धाराशिवमध्ये महायुतीत मैत्रीचा नवा अध्याय, भाजपा आमदाराच्या कार्यक्रमात ओमराजेंना मानाचं पान, राणाजगजितसिंहांना डावललं  
धाराशिवमध्ये महायुतीत मैत्रीचा नवा अध्याय, भाजपा आमदाराच्या कार्यक्रमात ओमराजेंना मानाचं पान, राणाजगजितसिंहांना डावललं  

व्हिडीओ

Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke : लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
Devendra Fadnavis: तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Embed widget