Sharad Pawar Meeting's : लोकसभा निवडणूकीपूर्वी शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या हातातून पक्षाचं चिन्ह गेलं. पुतणे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक सहकाऱ्यांनी साथ सोडली. पक्षात फूट पडल्यानंतर चिन्ह गेलं, नाव गेले. मात्र, एवढं सगळं होऊनही शरद पवारांनी (Sharad Pawar) जिद्द सोडलेली नाही. लोकसभा निवडणूकीच्या काळात शरद पवारांनी (Sharad Pawar) 60 दिवसांत जवळपास 79 सभा घेतल्या आहेत. याशिवाय शरद पवारांनी 17 पत्रकार परिषदाही घेतल्या आहेत. 


शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 10 उमेदवार रिंगणात 


शरद पवारांची (Sharad Pawar) राष्ट्रवादी काँग्रेस लोकसभा निवडणूकीत महाविकास आघाडीचा भाग होती. शरद पवारांनी भाजपसोबत न जाता इंडिया आघाडीत राहण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाट्याला 10 जागा आल्या होत्या. शरद पवारांनी आपल्या 10 उमेदवारांसाठी महाराष्ट्रचं पिंजून काढलाय. एतकेच नाही तर पवारांनी उद्धव ठाकरेंच्या आणि काँग्रेसच्या अनेक उमेदवारांसाठी देखील सभा घेतल्या आहेत. 


बारामतीत सुप्रिया सुळेंसाठी डिप्लोमसी 


शरद पवारांनी (Sharad Pawar) संपूर्ण महाराष्ट्रात सभा तर घेतल्याच पण सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात देखील खास लक्ष दिले. बारामती लोकसभेच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्यासाठी पवारांनी विरोधकांची भेटीगाठी घेतल्या. जुने विरोधक असलेल्या अनंतराव थोपटे यांची भेट घेऊन सुळेंचा मार्ग सोपा करण्यासाठी प्रयत्न केले. शिवाय अनंतराव थोपटे यांचे पुत्र आणि आमदार संग्राप थोपटे यांना आपल्या बाजूने वळवण्यासही शरद पवारांना यश आले. 


लोकसभा निवडणूकीदरम्यान पीएम मोदींचे हल्ले 


लोकसभा निवडणुकीदरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांवर जोरदार हल्लाबोल केलाय. मोदींनी शरद पवारांचा उल्लेख भटकती आत्मा असा केला. त्यावर शरद पवारांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलं. पीएम मोदी घाबरले आहेत, त्यामुळे व्यक्तीगत हल्ले करत आहेत. केंद्रातील सत्ता उखडून टाकल्याशिवाय गप्प बसणार नाही, असं शरद पवारांनी म्हटलं होतं. 


महाराष्ट्रात निवडणुका संपल्यानंतर शरद पवारांच्या हरियाणात सभा 


महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीसाठी 5 टप्प्यात मतदान पार पडले. दरम्यान, महाराष्ट्रातील मतदान पार पडल्यानंतर शरद पवार (Sharad Pawar) हरियाणात पोहोचले आहेत. त्यांनी महाराष्ट्राबाहेरील इंडिया आघाडीच्या बैठकांसाठी सभा घेण्या सुरुवात केली आहे. आज त्यांनी करनाल येथे इंडिया आघाडीचे उमेदवार मराठा विरेंद्र शर्मा यांच्यासाठी सभा घेतली आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या 


 VIDEO : पालकांनो, स्वातंत्र्याचा स्वैराचार होऊ देऊ नका, फडणवीसांचं आवाहन, मुलांच्या हाती स्टिअरिंग देण्यापूर्वी गृहमंत्री काय म्हणाले ऐका!