Sharad Pawar on Ajit Pawar, Pune Press Conference : माझी भावंड मी निवडणुकीला उभा राहिलो तेव्हा प्रचारासाठी आली नाहीत. मात्र, आता पायाला भिंगरी लावून फिरत आहेत, असं उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी म्हटलं होतं. शिवाय, आजपर्यंत तुम्ही पवारांच्या मागे उभा राहिलात, आताही मतदान करताना ज्या ठिकाणी पवार दिसेल त्या ठिकाणी मतदान करा, म्हणजे पवारांना मतदान केल्याचं तुम्हाला समाधान मिळेल, असं आवाहनही अजित पवारांनी केलं होतं. अजित पवारांना आता शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार (Sharad Pawar) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. 


काय म्हणाले शरद पवार ? 


माझी निवडणूक ,अजितची निवडणूक असो, किंवा सुप्रियाची निवडणूक असो माझ्या कुटुंबातील बाकीचे घटक लोकांच्यात जातात. भूमिका मांडतात आणि लोकांचा पाठिंबा मिळवण्यासाठी प्रयत्न करतात, असंही शरद पवार यांनी स्पष्ट केलं. पवारांनाच मतदान करा, यामध्ये काही चुकीचे नाही. पण मूळ पवार आणि बाहेरुन आलेला पवार यामध्ये फरक आहे, असा टोलाही त्यांनी (Sharad Pawar)  यावेळी बोलताना अजित पवार यांना लगावला. पुण्यात शरद पवारांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते. शिरुरचे उमेदवार अमोल कोल्हेही उपस्थित होते. 


16 तारखेला धैर्यशील मोहिते पाटील आमच्या पक्षात प्रवेश करतील


पुढे बोलताना शरद म्हणाले, विविध राजकीय संघटनेमध्ये अतिशय चांगलं काम करणारे सहकारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये लोकांचे काम करण्यासाठी सहभागी होत आहेत. देशमुखांनी आज निर्णय घेतला. लोकांचे काम करण्याची भूमिका त्यांनी खेड तालुक्यात बजावली. परंतु, लोकांच्या समस्यात आणि भाजपच्या धोरणात फरक आहे. त्यामुळेच त्यांनी निर्णय घेतला. मी त्यांच्या निर्णयाचे स्वागत करतो. येत्या 16 तारखेला धैर्यशील मोहिते पाटील आमच्या पक्षात प्रवेश करतील. जयंत पाटील यांच्या उपस्थितीत ते प्रवेश करतील. 


विजय दादांची भूमिका काय?


विजयदादांचे काही शारीरिक प्रश्न आहेत. त्यांना बोलायला त्रास होतो. मात्र, तिथला प्रत्येक निर्णय विजयदादांच्या संमतीने आणि मार्गदर्शनाने त्यांचे सहकारी निर्णय घेतील. तशीच त्यांची मनस्थिती आहे, असं शरद पवारांनी (Sharad Pawar) स्पष्ट केलं. मूळ पवार आणि बाहेरुन आलेला पवार यामध्ये फरक आहे, असा टोलाही त्यांनी (Sharad Pawar)  यावेळी बोलताना अजित पवार यांना लगावला. 


इतर महत्वाच्या बातम्या 


ते डोक्यावर बर्फ ठेवतात कारण त्यांना अनेक अनुभव, मुख्यमंत्र्यांच्या भाषणावेळी अजितदादा खळखळून हसले