पुणे: आता मनसेने (Raj Thackeray MNS) आपल्याला पाठिंबा दिला आहे, आपली ताकद मोठी आहे. आपल्या महायुतीचं वातावरण राज्यभर आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde Pune) म्हणाले. ते पुण्यात बोलत होते. पुण्यातील बालगंधर्व इथे महायुतीचा मेळावा पार पडला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवारही (Ajit Pawar) उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले, पुणे लोकसभेचे उमदेवार मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) आणि इतर आपले सगळे उमेदवार रेकॉर्ड ब्रेक मतांनी विजयी होतील, कारण आपले कार्यकर्ते चार्ज आहेत.


गेल्या 30 वर्षांपासून आपली नैसर्गिक युती आहे. त्यामध्ये काही विघ्न आली, पण आपण पुन्हा युती केली आणि आता अजित पवार सोबत आले. आपली महायुती मजबूत झाली. अनेक लोक म्हणत होते की सरकार पडणार पडणार, आता बंद झालं आहे असं म्हणणं. आता तर मनसेनेही पाठिंबा दिला आहे. त्यामुळे आपली ताकद वाढली आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले.


पुण्यातील चारही मतदारसंघात महायुतीची लाट


मोदींजींच्या कामामुळेआपली महायुती भक्कम होत चालली आहे. संपूर्ण देशात मोदी लाट आहे. लोकांनी ठरवलं आहे की मोदींना पुन्हा पंतप्रधान करायचं आहे. 
अब की बार 45 पार, आपण 48 पण जाऊ शकतो. आपले चारही उमेदवार आहेत, चारही मतदारसंघात पुणे, मावळ, शिरुर आणि बारामतीमध्ये महायुतीची लाट आहे. 


मुरलीधर मोहोळ यांना गिरीश बापट यांचा  वारसा पुढे चालवायचा आहे. माझहे आणि त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. गिरीश बापट मला मोठ्या भावसारखे होते. 
आता आपला खासदार पुण्यातून  दिल्लीला जाणार आहे. इथं भाऊ तात्या कुणी नाही मुरली अण्णाच निवडून येणार, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.


धंगेकर, वसंत मोरेंवर निशाणा 


मोहोळ यांना कुटुंबातून पैलवान असल्याचा वारसा आहे. पण ते वाटत नाहीत पैलवान आहेत. त्यांना कुठला डाव कधी टाकायचं हे सर्व माहिती आहे आणि स्वार्थासाठी राजकीय आखाडा बदलणारा माणूस आपल्याला नको आहे, असं मुख्यमंत्री शिंदे यांनी काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर आणि वंचितचे उमेदवार वसंत मोरे या दोन्ही उमेदवारांवर नाव न घेता टीका केली.


अजितदादांही खळखळून हसले


अजितदादा बोलताना म्हणाले डोक्यावर बर्फ ठेवा ते ठेवतात कारण त्यांना असे अनेक अनुभव आले आहेत, असं मुख्यमंत्री म्हणाले. एकनाथ शिंदे यांच्या या विधानावर अजित पवार देखील खळखळून हसले. 


Ajit Pawar speech Pune Video:  अजित पवार यांचं भाषण



 


संबंधित बातम्या 


Ajit Pawar : रुसून बसू नका, तुमच्या माझ्या घरचं लग्न नाही, अजित पवारांचा कार्यकर्त्यांना प्रेमळ दम