Ajit Pawar Seats in Mahayuti : महायुतीतील जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. महायुतीमध्ये नाशिक आणि ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या जागेवरुन वाद सुरु आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेली ठाण्याची जागा लढवण्यासाठी भारतीय जनता पक्ष इच्छुक आहे. तर नाशिकच्या जागेवर अजित पवारांच्या (Ajit Pawar) राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी दावा ठोकलाय. शिवाय रत्नागिरी- सिंधुदुर्गच्या जागेवरही भाजप आणि शिंदे गटात वादंग सुरु आहे. रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेवरुन भाजपचे राज्यसभेचे खासदार नारायण राणे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. तर शिंदे गटाकडून रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेवर मंत्री उदय सामंत यांच्या भावाला उमेदवारी मिळवी यासाठी प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान, महायुतीच्या जागा वाटपात भाजपचे वर्चस्व स्पष्ट दिसून येतय. भाजपचं मोठा भाऊ आहे. तर उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादीला आत्तापर्यंत 4 जागा मिळाल्या आहेत. 


एक उमेदवार शिंदे गटाकडून तर एक उमेदवार भाजपकडून आयात


अजित पवारांवर (Ajit Pawar) निवडणूक लढण्यासाठी उमेदवार आयात करण्याची वेळ आली आहे. खासदार अमोल कोल्हे यांना शरद पवारांच्या राष्ट्रवादीने पुन्हा एकदा शिरुर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. तर अजित पवारांनी अमोल कोल्हे यांच्याशी दोन-हात करण्यासाठी शिवाजी आढळराव पाटील यांना शिंदे गटाकडून आयात केलय. तर धाराशिव लोकसभा मतदारसंघातून ठाकरे गटाने विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर यांना पुन्हा एकदा रिंगणात उतरवलय. तर अजित पवारांना धाराशिवमध्येही उमेदवार आयात करावा लागलाय. 


रायगडमध्ये सुनील तटकरेंना तिकीट तर बारामतीमध्ये सुनेत्रा पवारांना उमेदवारी 


अजित पवारांनी (Ajit Pawar) रायगड लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंना उमेदवारी दिली आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत सुनील तटकरे यांनी शिवसेनेच्या अनंत गिते यांचा पराभव केला होता. त्यानंतर अजित पवारांनी त्यांना पुन्हा एकदा रिंगणात उतरवलय. तर बारामती लोकसभा मतदारसंघातून अजित पवारांनी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिली आहे. शरद पवारांनी सुप्रिया सुळेंना चौथ्यांदा बारामतीतून उमेदवारी दिल्याने आता नणंद आणि भावजयमध्ये सामना रंगणार आहे. 


नाशिकची जागा अजित पवारांना मिळण्याची शक्यता (Ajit Pawar Seats in Mahayuti)


अजित पवारांची (Ajit Pawar) राष्ट्रवादी काँग्रेस नाशिकची जागा लढवण्यासाठी आग्रही आहे. मंत्री छगन भुजबळ नाशिकमधून लोकसभा निवडणूक लढतील, असं बोललं जात आहे. तर शिंदे गटाकडून विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनी उमेदवारी मिळवण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर शक्तीप्रदर्शन केलंय. शिवाय भारतीय जनता पक्षानेही नाशिकची जागा लढवण्यासाठी तयारी दर्शवली आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Ashish Shelar : मोठी बातमी : उद्धव ठाकरे मोदी-शाहांच्या संपर्कात आहेत का? आशिष शेलारांचा मोठा दावा