एक्स्प्लोर

वस्ताद कोल्हापुरात दाखल, पंचशील हॉटेलवर राजकीय घडामोडींना वेग, के.पी. पाटील, ए.वाय, पाटील शरद पवारांच्या भेटीला

Kolhapur News: शरद पवार हे कोल्हापूरमध्ये दाखल झाले आहेत. समरजीत घाटगे आणि शरद पवार भेटले. त्यांच्यात सध्या चर्चा सुरु आहे. आज समरजीत घाटगे शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत. गैबी चौकात शरद पवारांची सभा

कोल्हापूर: राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय समीकरणांचे आपले पत्ते एक-एक करुन उघड करायला सुरुवात केली आहे. भाजपचे नेते समरजीत घाटगे (Samarjit Ghatge) हे मंगळवारी शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत. त्यासाठी शरद पवार (Sharad Pawar) कोल्हापूरमध्ये दाखल झाले आहेत. पुढील चार दिवस शरद पवार यांचा मुक्काम कोल्हापूरमध्येच असेल. त्यामुळे सध्या शरद पवार यांचा मुक्काम असलेल्या पंचशील हॉटेलवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

आज सकाळीच शरद पवार यांची भेट घेण्यासाठी महायुतीमधील दोन बडे नेते पंचशील हॉटेलवर दाखल झाले. काहीवेळापूर्वीच अजितदादा गटाचे के.पी. पाटील ( K P Patil) पंचशील हॉटेलवर पोहोचले. त्यांच्यापाठोपाठ ए.वाय. पाटील (A Y Patil) हेदेखील हॉटेलमध्ये पोहोचले. एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले हे दोन्ही नेते अजित पवार गटात होते. मात्र, या दोघांनी आता विधानसभेच्या उमेदवारीसाठी अजितदादा गटाला सोडचिठ्ठी देत महाविकास आघाडीकडून तिकीट मिळवण्याची तयारी सुरु केली आहे.

के.पी. पाटील आणि ए.वाय. पाटील या दोघांनाही राधानगरी भुदरगड विधानसभा मतदरासंघातून निवडणूक लढवायची आहे. या मतदारसंघात सध्या शिंदे  गटाचे प्रकाश आबिटकर हे आमदार आहेत. महायुतीच्या जागावाटपच्या सूत्रानुसार ही जागा पुन्हा शिंदे गटाच्याच वाट्याला जाऊ शकते. त्यामुळे आता ए.वाय. पाटील आणि के.पी. पाटील यांनी महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. 

यापैकी के.पी. पाटील यांनी मविआतील तिन्ही पक्षांकडे उमेदवारी मागितली आहे. मात्र, मविआच्या जागावाटपात राधानगरी-भुदरगड हा मतदारसंघ ठाकरे गटाच्या वाट्याला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे ठाकरे गटाची संभाव्य उमेदवारी आपल्याला मिळावी, यासाठी के.पी. पाटील आणि ए.वाय. पाटील दोघेही प्रयत्नशील आहेत. या पार्श्वभूमीवर या दोन्ही नेत्यांची शरद पवारांसोबतची भेट महत्त्वाची मानली जात आहे. हे दोन्ही नेते परस्परांचे कट्टर राजकीय वैरी आहेत. हे दोघेही जवळपास एकाचवेळी शरद पवार यांना भेटण्यासाठी पंचशील हॉटेलवर दाखल झाले आहेत. त्यामुळे शरद पवार या दोन्ही नेत्यांशी काय बोलणार, हे पाहावे लागेल. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीच्यादृष्टीने राजकीय गणित जमवण्यासाठी शरद पवार हे के.पी. पाटील आणि ए.वाय. पाटील यांच्यात समेट घडवून आणणार का, याकडेही साऱ्यांच्या नजरा लागल्या आहे. 

कोल्हापूरच्या गैबी चौकात 10 वर्षांनी शरद पवारांची सभा

शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू समजले जाणाऱ्या समरजीत घाटगे यांना गळाला लावून भाजपला मोठा धक्का दिला आहे. समरजीत घाटगे आगामी विधानसभा निवडणुकीत कागल मतदारसंघातून हसन मुश्रीफ यांच्याविरोधात दंड थोपटतील. आज शरद पवार यांच्या उपस्थितीत समरजीत घाटगे तुतारी हाती धरतील. यानिमित्ताने तब्बल 10 वर्षांनी गैबी चौकात शरद पवार यांची सभा होणार आहे. 

आणखी वाचा

विधानसभा निवडणुकीत कागलमधून मुश्रीफांविरोधात रिंगणात उतरणार? समरजीत घाटगेंचं रोखठोक वक्तव्य; म्हणाले...

एबीपी माझामध्ये कोल्हापूर ब्युरो म्हणून गेल्या साडे तीन वर्षांपासून कार्यरत. तसेच टीव्ही 9 मराठी कोल्हापूर ब्युरो म्हणूनही कामाचा अनुभव. 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Dagdu Sakpal : मुलीला उमेदवारी नाही, पक्षाला आपली गरज संपली; ठाकरेंचा माजी आमदार नाराज, शिंदेंनी मध्यरात्रीच भेट घेतली
मुलीला उमेदवारी नाही, पक्षाला आपली गरज संपली; ठाकरेंचा माजी आमदार नाराज, शिंदेंनी मध्यरात्रीच भेट घेतली
मोठी बातमी ! नवी मुंबईतील प्रभाग 17 मधील निवडणुकीला हायकोर्टाकडून अंतरिम स्थगिती; भाजप उमेदवाराला दिलासा
मोठी बातमी ! नवी मुंबईतील प्रभाग 17 मधील निवडणुकीला हायकोर्टाकडून अंतरिम स्थगिती; भाजप उमेदवाराला दिलासा
मुंबईत कुर्ला स्टेशनदरम्यान लोकल ट्रेनला भीषण आग, डब्बा जळून खाक; CSMT कडे जाणारी वाहतूक विस्कळीत
मुंबईत कुर्ला स्टेशनदरम्यान लोकल ट्रेनला भीषण आग, डब्बा जळून खाक; CSMT कडे जाणारी वाहतूक विस्कळीत
Share Market Crash : सेन्सेक्स निफ्टीत घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात  8 लाख कोटी स्वाहा, घसरणीचं कारण जाणून घ्या 
सेन्सेक्स निफ्टीत घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात  8 लाख कोटी स्वाहा, घसरणीचं कारण जाणून घ्या 

व्हिडीओ

Ajit Pawar VS Murlidhar Mohol : पिंपरी-चिंचवड जिंकण्यासाठी दोन पैलवान रिंगणात Special Report
Jayant Patil Sangli : भाजप नेते अन् Ajit Pawar यांच्या राष्ट्रवादीत वाद, जयंत पाटील काय म्हणाले?
Amit Thackeray Majha Katta : दोन्ही भाऊ एकत्र, BMC कशी जिंकणार?; राज 'पुत्र' अमित ठाकरे 'माझा कट्टा'वर
Imtiyaz Jaleel Chhatrapati Sambhajinagar राडा, कारवर हल्ला, मारहाणीनंतर जलीलांची पहिली प्रतिक्रिया
Imtiyaj Jaleel Sambhajinagar काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dagdu Sakpal : मुलीला उमेदवारी नाही, पक्षाला आपली गरज संपली; ठाकरेंचा माजी आमदार नाराज, शिंदेंनी मध्यरात्रीच भेट घेतली
मुलीला उमेदवारी नाही, पक्षाला आपली गरज संपली; ठाकरेंचा माजी आमदार नाराज, शिंदेंनी मध्यरात्रीच भेट घेतली
मोठी बातमी ! नवी मुंबईतील प्रभाग 17 मधील निवडणुकीला हायकोर्टाकडून अंतरिम स्थगिती; भाजप उमेदवाराला दिलासा
मोठी बातमी ! नवी मुंबईतील प्रभाग 17 मधील निवडणुकीला हायकोर्टाकडून अंतरिम स्थगिती; भाजप उमेदवाराला दिलासा
मुंबईत कुर्ला स्टेशनदरम्यान लोकल ट्रेनला भीषण आग, डब्बा जळून खाक; CSMT कडे जाणारी वाहतूक विस्कळीत
मुंबईत कुर्ला स्टेशनदरम्यान लोकल ट्रेनला भीषण आग, डब्बा जळून खाक; CSMT कडे जाणारी वाहतूक विस्कळीत
Share Market Crash : सेन्सेक्स निफ्टीत घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात  8 लाख कोटी स्वाहा, घसरणीचं कारण जाणून घ्या 
सेन्सेक्स निफ्टीत घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात  8 लाख कोटी स्वाहा, घसरणीचं कारण जाणून घ्या 
मोठी बातमी ! मुंबईसह 29 ठिकाणी 15 जानेवारीला सुट्टी जाहीर; शासनाची अधिसूचना जारी
मोठी बातमी ! मुंबईसह 29 ठिकाणी 15 जानेवारीला सुट्टी जाहीर; शासनाची अधिसूचना जारी
ABP Majha Top 10 Headlines :  ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 जानेवारी 2026 | गुरुवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 जानेवारी 2026 | गुरुवार 
राज ठाकरे वैफल्यग्रस्त झाले, ठाकरेंची सत्ता आल्यास त्यांच्या बायका भांडत बसतील; प्रकाश महाजनांची जहरी टीका
राज ठाकरे वैफल्यग्रस्त झाले, ठाकरेंची सत्ता आल्यास त्यांच्या बायका भांडत बसतील; प्रकाश महाजनांची जहरी टीका
Sangli Municipal Corporation Election: सांगलीत ऐन निवडणुकीत पोलिसांचा मोठा दणका; अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारासह 8 जण हद्दपार
सांगलीत ऐन निवडणुकीत पोलिसांचा मोठा दणका; अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारासह 8 जण हद्दपार
Embed widget