Devendra Fadnavis on Sharad Pawar: 2019 मध्ये महाराष्ट्राच (Maharashtra Politics) राष्ट्रपती राजवटीची (President Rule) कल्पना थोरल्या पवारांचीच होती, असं खळबळजनक वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केलं आहे. तसेच, देवेंद्र फडणवीसांनी अजित पवार (Ajit Pawar) ज्यावेळी महायुतीत सामील झाले, त्यावेळी शरद पवार (Sharad Pawar) यांची भूमिका काय होती? यावरही भाष्य केलं आहे. दरम्यान, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इंडिया टुडे कॉन्क्लेव्हसाठी उपस्थित होते. तिथे बोलताना त्यांनी 2019 च्या सत्तानाट्याबाबत खळबळजनक खुलासा केला आहे. देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्यानंतर संपूर्ण राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. 


महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इंडिया टुडे कॉन्क्लेव्हमध्ये (India Today Conclave Mumbai 2023) बोलताना सांगितलं की, 2019 मध्ये राज्यात राष्ट्रपती राजवटीची कल्पना शरद पवार यांचीच होती. 2019 मध्ये शिवसेनेनं आमचा विश्वासघात करून काँग्रेस-राष्ट्रवादीशी बोलणी सुरू केली, तेव्हा उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करण्याबाबत हालचाली सुरू असल्याचं कानावर आलं. त्यावेळी राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी आम्हाला त्रिपक्षीय सरकार नको असल्यानं आम्ही तुमच्यासोबत (भाजप) येऊ शकतो, असा प्रस्ताव दिला होता."


हल्ली आजारी पडलो तरी बातमी होते : देवेंद्र फडणवीस 


इंडिया टुडे कॉन्क्लेव्हमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार तीन महिन्यांत दुसऱ्यांदा आजारी पडले आहेत. ते मंत्रिमंडळाच्या बैठकांनाही येत नाहीत. पूर्वी ते बारामतीला जायचे तेव्हा आम्हाला वाटायचं की, ते शरद पवारांवर चिडले आहेत. यामुळे तुम्हाला मंत्रिमंडळ विस्तारासाठी दिल्लीला जावं लागतंय, असं वाटतंय... देवेंद्र फडणवीस बोलताना म्हणाले की, "आज राजकारणातील परिस्थिती इतकी बिकट आहे की, आपण आजारी पडलो तरी त्याची बातमी बनवते आणि त्यातून विविध प्रकारचे तर्कही काढले जातात. मी त्यांच्याशी बोललो, त्यावेळी त्यांचा आवाजही येत नव्हता. तसेच, आमचं दिल्लीला जाणं आधीच ठरलं होतं. आम्ही दिल्लीला गेलो. आम्ही अशा फेडरेशनमध्ये काम करतो की, राज्य सरकारला केंद्र सरकारशी समन्वय ठेवावा लागतो, त्यामुळे त्यात काहीच अडचण नाही, असं मला वाटतं."


उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कोणतंही सरकार चालवणं हे आव्हान असतं. एक भागीदार असो, दोन असो किंवा एकही नसो, तरीही आव्हानं असतातच. काहीवेळा गोष्टी तुमच्या इच्छेनुसार घडतात, तर कधी घडत नाहीत. तुम्हाला हॉट सीटवर बसावंच लागेल. आघाडी सरकारच्या काही अडचणी आहेत, पण त्याचे काही फायदेही आहेत. तसेच, ते पुढे बोलताना म्हणाले की, तुम्हाला मूड ऑफ नेशनमध्ये मूड ऑफ महाराष्ट्र समजत नाहीये, महाराष्ट्रात मोदींबद्दल प्रेम आहे. राष्ट्राच्या मूडमध्ये महाराष्ट्राचा मूड समजू शकत नाही. महाराष्ट्रात मोदींबद्दल प्रेम आहे. त्यामुळेच आपण ही भावना पकडू शकत नाही. आम्ही महाराष्ट्रात 48 पैकी 49 जिंकू शकत नाही. त्यामुळेच आम्ही 40 हून अधिक जागा जिंकत असल्याचा आमचा दावा आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


आधी म्हणाले होते, राष्ट्रवादीसोबत युती नाही, नाही, नाही, आता म्हणतात, मुख्यमंत्री बदलणार नाही, नाही नाही!