Devendra Fadnavis on Maharashtra CM : गेल्या दोन वर्षांत राज्यानं अभूतपूर्व संघर्ष अनुभला. आधी शिवसेनेतील फूट (Shinde Group) आणि त्यानंतर राष्ट्रवादीतील फूट यानंतर राज्याच्या राजकारणाला (Maharashtra Politics) अभूतपूर्व कलाटणी मिळाली. राज्यातील दोन मोठ्या प्रादेशिक पक्षांमधील अंतर्गत फुटीनंतर राज्यात भाजप (BJP), शिंदे गट (Shinde Group) आणि राष्ट्रवादीचा (NCP) अजित पवार गटानं (Ajit Pawar Group) एकत्र येत राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झालं. पण त्यानंतर अनेक तर्कवितर्क लावले जात होते. अजित पवार सामील झाल्यापासूनच आता शिंदेंचं मुख्यमंत्री पद जाणार आणि त्याऐवजी अजित पवार मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार, अशा चर्चांनी जोर धरला आहे. पण आज इंडिया टुडे कॉन्क्लेव्हमध्ये (India Today Conclave Mumbai 2023) बोलताना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच आहेत आणि यापुढेही तेच राहतील असं स्पष्ट केलं आहे.  


इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह या मुंबईतील कार्यक्रमात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. यावेळी त्यांना अजित पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चांबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बदलणार नाही, बदलणार नाही, बदलणार नाही.


महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच आहेत आणि तेच राहतील :देवेंद्र फडणवीस


"मला हे स्पष्ट करायचं आहे की, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच आहेत आणि एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री राहतील. लोकसभा असो की, विधानसभेच्या निवडणुका त्यांच्याच नेतृत्वाखाली लढल्या जातील. महाराष्ट्रात मुख्यमंत्री बदलणार आहेत हे तुम्ही मनातून काढून टाका. मुख्यमंत्री बदलणार नाहीत, बदलणार नाहीत.", असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. 


"मीही वकील आहे. एक वकील असल्यानं मी तुम्हाला सांगतो की, शिवसेना (शिंदे गट) प्रकरणी सभापतींपुढेही शिंदे गटाची बाजू अधिक मजबूत आहे. शिंदे यांच्या अपात्रतेच्या बातम्या शरद पवार किंवा ठाकरे यांच्या गटाकडून वारंवार पसरवल्या जातात. सुप्रीम कोर्टात ठाकरे गटाविरुद्धचा खटला एकनाथ शिंदे गटच जिंकणार आहे, असा विश्वासही फडणवीसांनी बोलताना व्यक्त केला आहे. 


2019 मध्ये राष्ट्रवादीची आयडिया शरद पवारांचीच : देवेंद्र फडणवीस 


2019 मध्ये राज्यात राष्ट्रपती राजवटीची कल्पना शरद पवार यांचीच होती. 2019 मध्ये शिवसेनेनं आमचा विश्वासघात करून काँग्रेस-राष्ट्रवादीशी बोलणी सुरू केली, तेव्हा उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करण्याबाबत हालचाली सुरू असल्याचं कानावर आलं. त्यावेळी राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी आम्हाला त्रिपक्षीय सरकार नको असल्यानं आम्ही तुमच्यासोबत (भाजप) येऊ शकतो, असा प्रस्ताव दिला होता."


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


'राष्ट्रपती राजवटीची आयडिया शरद पवारांचीच होती; फडणवीसांनी अजितदादांसोबतच्या युतीचं 'सत्य' उलगडलं