एक्स्प्लोर

शरद पवारांना केंद्राच्या झेड प्लस सुरक्षेवर संशय; निवडणुकीच्या काळात ऑथेन्टिक माहिती मिळवण्यासाठी ही व्यवस्था, थोरल्या पवारांचं मोठं वक्तव्य

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांना नुकतीच केंद्र सरकारनं Z+ सुरक्षा देऊ केली आहे. पण, शरद पवारांनी मात्र, केंद्राच्या झेड प्लस सुरक्षेवर शरद पवारांनी संशय व्यक्त केला आहे.

Sharad Pawar on Z Plus Security : महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना केंद्र सरकारच्या वतीनं Z+ सुरक्षा देण्यात आली आहे. केंद्रीय एजन्सींनी संभाव्य धोक्यांचा आढावा घेतल्यानंतर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शरद पवार यांना उच्चस्तरीय सशस्त्र व्हीआयपी सुरक्षा कवच देण्याची शिफारस केली. त्यानंतर केंद्रीय गृह मंत्रालयानं त्यांना झेड प्लस सुरक्षा देऊ केली आहे. दरम्यान, शरद पवारांनी मात्र, त्यांना देऊ केलेल्या Z+ सुरक्षेवरुन संशय व्यक्त केला आहे. मला दिलेली सुरक्षा म्हणजे, निवडणुकीच्या काळात ऑथेन्टिक माहिती मिळवण्याची व्यवस्था असल्याचं शरद पवार म्हणाले आहेत. 

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांना नुकतीच केंद्र सरकारनं Z+ सुरक्षा देऊ केली आहे. पण, शरद पवारांनी मात्र, केंद्राच्या झेड प्लस सुरक्षेवर शरद पवारांनी संशय व्यक्त केला आहे. झेड प्लस सुरक्षा म्हणजे, निवडणुकीच्या काळात ऑथेन्टिक माहिती मिळवण्याची व्यवस्था असू शकते, असं शरद पवार म्हणाले आहेत. 

निवडणुकीच्या काळात ऑथेन्टिक माहिती मिळवण्यासाठी ही व्यवस्था : शरद पवार 

केंद्र सरकारनं देऊ केलेल्या झेड प्लस सुरक्षेबाबत बोलताना शरद पवार म्हणाले की, "काल माझ्याकडे केंद्रातील गृहखात्याचे एक अधिकारी आले. कदाचित निवडणुका आहेत. निवडणुकांसाठी मी सगळीकडे फिरणार, त्यामुळे निवडणुकीच्या काळात ऑथेन्टिक माहिती मिळवण्यासाठी ही व्यवस्था असू शकते, बाकी मला काही माहिती नाही."

महाराष्ट्रात आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा आणि ओबीसी समाजामध्ये निर्माण झालेला तणाव हे शरद पवारांच्या सुरक्षा वाढवण्यामागचं कारण असू शकते, असं मानलं जात आहे. आणि त्यामुळेच केंद्र सरकारनं शरद पवार यांचे विधानसभा निवडणुकीचे दौरे लक्षात घेऊन त्यांच्या सुरक्षेत वाढ केल्याची माहिती मिळतेय. महाराष्ट्रात लवकरच विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत आणि त्याआधीच शरद पवारांना देण्यात आलेली झेड प्लस सुरक्षा यामुळे राजकीय वर्तुळात दबक्या आवाजात चर्चा सुरू होत्या. अशातच आता खुद्द थोरल्या पवारांनीच वक्तव्य केल्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. 

Z+ सुरक्षा कोणाला दिली जाते?

शरद पवारांना केंद्र सरकारच्या वतीनं झेड प्लस सुरक्षा देण्यात आली आहे. पण तुम्हाला माहितीय का? झेड प्लस सुरक्षा कुणाला दिली जाते? Z+ सुरक्षा ही देशातील आणि राज्यातील अत्यंत अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना दिली जाते. राष्ट्रपती, पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना Z+ सुरक्षा दिली जाते. यात एक पोलीस अधिकाऱ्यासह दहापेक्षा जास्त एनएसजी कमांडो असतात. पहिल्या घेराव्यास एनएसजी जबाबदार आहे. दुसरा थर एसपीजी कमांडोद्वारे ठेवलेला आहे.त्यात आयटीबीपी आणि सीआरपीएफ जवानांचा समावेश आहे. एस्कॉर्ट आणि पायलट वाहनांची सुविधा देखील दिली जाते.

पाहा व्हिडीओ : Sharad Pawar on Z Plus Security :केंद्राकडून Z+ सुरक्षा मिळाल्यानंतर शरद पवार यांनी व्यक्त केला संशय

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

CIDCO : नवी मुंबईत सिडकोची 4,508 घरे विक्रीस, ‘पहिले येणाऱ्यास पहिले प्राधान्य’ पद्धतीने घर घेण्याची सुवर्णसंधी
नवी मुंबईत सिडकोची 4,508 घरे विक्रीस, ‘पहिले येणाऱ्यास पहिले प्राधान्य’ पद्धतीने घर घेण्याची सुवर्णसंधी
Ram Mandir :  श्रद्धा आणि पवित्रतेचा स्पर्श, अयोध्येच्या राम मंदिराचे मनमोहक फोटो
श्रद्धा आणि पवित्रतेचा स्पर्श, अयोध्येच्या राम मंदिराचे मनमोहक फोटो
IND A vs BAN A : भारत आशिया कप रायझिंग स्टार्समधून बाहेर, सुपर ओव्हरमध्ये जितेश शर्माचे दोन निर्णय चुकले, बांगलादेश अंतिम फेरीत
भारत आशिया कप रायझिंग स्टार्समधून बाहेर, सुपर ओव्हरमध्ये बांगलादेश विजयी, जितेश शर्माचं काय चुकलं
Tejas Fighter Jet Crashed: दुबई एअर शोमध्ये तेजस लढाऊ विमान कोसळलं; व्हिडिओ पाहून धडकी भरायची वेळ, पायलटचा थांगपत्ता नाही
Video: दुबई एअर शोमध्ये तेजस लढाऊ विमान कोसळलं; व्हिडिओ पाहून धडकी भरायची वेळ, पायलटचा थांगपत्ता नाही
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Zero Hour Full : राज ठाकरेंना सोबत घेण्यासाठी शरद पवार सकारात्मक, काँग्रेस तयार होईल? 21 Nov 2025
Thane BJP - Shiv Sena Conflict : ठाण्यात भाजप-शिवसेनेत राडा, नेमकं काय घडलं? प्रत्यक्षदर्शी म्हणाले..
Rupali Chakankar on Melegaon : मालेगावातील नराधमाला कठोर शिक्षा दिली जाणार- रुपाली चाकणकर
Mahapalikecha Mahasangram Yavatmal : यवतमाळमधील समस्या सुटणार का? नागरिकांच्या अपेक्षा काय?
Dubai Tejas plane Crash : दुबई एअर शोमध्ये तेजस लढाऊ विमान कोसळलं; थक्क करणारा व्हिडिओ समोर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CIDCO : नवी मुंबईत सिडकोची 4,508 घरे विक्रीस, ‘पहिले येणाऱ्यास पहिले प्राधान्य’ पद्धतीने घर घेण्याची सुवर्णसंधी
नवी मुंबईत सिडकोची 4,508 घरे विक्रीस, ‘पहिले येणाऱ्यास पहिले प्राधान्य’ पद्धतीने घर घेण्याची सुवर्णसंधी
Ram Mandir :  श्रद्धा आणि पवित्रतेचा स्पर्श, अयोध्येच्या राम मंदिराचे मनमोहक फोटो
श्रद्धा आणि पवित्रतेचा स्पर्श, अयोध्येच्या राम मंदिराचे मनमोहक फोटो
IND A vs BAN A : भारत आशिया कप रायझिंग स्टार्समधून बाहेर, सुपर ओव्हरमध्ये जितेश शर्माचे दोन निर्णय चुकले, बांगलादेश अंतिम फेरीत
भारत आशिया कप रायझिंग स्टार्समधून बाहेर, सुपर ओव्हरमध्ये बांगलादेश विजयी, जितेश शर्माचं काय चुकलं
Tejas Fighter Jet Crashed: दुबई एअर शोमध्ये तेजस लढाऊ विमान कोसळलं; व्हिडिओ पाहून धडकी भरायची वेळ, पायलटचा थांगपत्ता नाही
Video: दुबई एअर शोमध्ये तेजस लढाऊ विमान कोसळलं; व्हिडिओ पाहून धडकी भरायची वेळ, पायलटचा थांगपत्ता नाही
Nitish Kumar : नितीश कुमारांचा मोठा निर्णय, 20 वर्षानंतर गृहमंत्रिपद सोडलं, 18 मंत्र्यांची खाती जाहीर, 6 मंत्री बिनखात्याचे
नितीश कुमारांचा मोठा निर्णय, 20 वर्षानंतर गृहमंत्रिपद सोडलं, 18 मंत्र्यांची खाती जाहीर, 6 मंत्री बिनखात्याचे
ईस्पोर्ट्स: तरूण भारतीयांसाठी एक विश्वासार्ह आणि महत्त्वाकांक्षी करियरचा मार्ग
ईस्पोर्ट्स: तरूण भारतीयांसाठी एक विश्वासार्ह आणि महत्त्वाकांक्षी करियरचा मार्ग
Dondaicha : दोंडाईचामध्ये भाजपच्या 26 नगरसेवकांसह नगराध्यक्ष बिनविरोध, महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांचे अर्ज मागे, राज्यातील पहिलीच नगरपरिषद
दोंडाईचामध्ये भाजपच्या 26 नगरसेवकांसह नगराध्यक्ष बिनविरोध, महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांचे अर्ज मागे, राज्यातील पहिलीच नगरपरिषद
AUS vs ENG : पर्थ कसोटीच्या पहिल्या दिवशी 19 विकेट, स्टार्कनंतर स्टोक्सचं वादळ, ॲशेस मालिकेच्या पहिला दिवस गोलंदाजांनी गाजवला
ॲशेसमध्ये पर्थ कसोटीच्या पहिल्या दिवशी 19 विकेट, स्टार्कनंतर स्टोक्सचं वादळ, फलंदाजांची धूळदाण
Embed widget