पुणे : शरद पवार (Sharad Pawar) यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर पक्ष फोडीवरून जोरदार घणाघात केला आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) दोन पक्ष फोडून आल्याचं सांगितलं, ते त्यांचं कर्तृत्व सांगत आहे. पक्ष फोडले म्हणणाऱ्यांना पक्षातील हजारो नाहीतर लाखोंच्या संख्येनं चिवट शिवसैनिक आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते त्यांना योग्य जागा दाखविल्याशिवाय राहणार नाहीत, असं म्हणत शरद पवारांनी (Sharad Pawar) उपमुख्यमंत्री फडणवीसांवर निशाणा साधला आहे.


शरद पवारांचा देवेंद्र फडणवीसांवर निशाणा


महाविकास आघाडी बारामती लोकसभा मतदार संघ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पदाधिकारी आणि कार्यकर्त्या मेळाव्याला शरद पवार यांची उपस्थिती लावली. या बैठकीला खासदार सुप्रिया सुळे आणि शिवसेना संपर्कप्रमुख सचिन अहिर यांची देखील उपस्थित होते. यावेळी शरद पवारांनी फडणवीसांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.


पक्ष फोडणाऱ्यांना योग्य जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही


मी दोन पक्ष फोडून आलो, असं देवेंद्र फडणवीसांनी एका भाषणात सांगितलं. त्यांचं काय कर्तृत्व आहे, ते सांगत आहेत.  पण, फोडलेल्या पक्षांमध्ये हजारो, लाखो कार्यकर्ते आहेत. ते असं बोलणाऱ्यांना योग्य जागा दाखवल्याशिवाय राहणार नाहीत, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. काही लोकांनी व्यक्तिगत हल्ले सुरू केले आहेत. पण पक्ष फोडणाऱ्यांना लाखो कार्यकर्ते आणि शिवसैनिक योग्य जागा दाखवल्याशिवाय राहणार नाहीत. आम्ही महाराष्ट्रमध्ये नेतृत्व करू, असं पवार म्हणाले आहेत.


दमदाटीला बळी पडणारी ही औलाद नाही


खऱ्या अर्थानं आपणं माणसं एकत्र जोडण्याचं काम करतो, त्यांच्याबद्दल आदर दाखवतो. पण यांनी पक्ष फोडले. तरी कार्यकर्ते मजबुतीने उभे आहेत. काही जण दमदाटी करीत आहेत, पण त्यांना माहीत नसेल की, दमदाटीला बळी पडणारी ही औलाद नाही. आज बारामतीकडे सुदैवाने देशाचे लक्ष आहे. आपण नक्की जास्त जागा जिंकू, असा विश्वास शरद पवारांनी यावेळी व्यक्त केला आहे. 


शरद पवारांकडून उद्धव ठाकरेंचं कौतुक


महाविकास आघाडी सरकारमध्ये मुख्यमंत्री कुणाला करायचं याची चर्चा सुरू होती, त्यावेळी उद्धव ठाकरे माझ्या शेजारी बसले होते, मी त्यांचा हात धरला आणि वर केला. त्यांनी मुख्यमंत्री व्हावं, ही माझी भूमिका होती, त्यांना रस नव्हता. कोरोना काळात त्यांनी चांगलं काम केलं. तब्येत ठिक नसतानाही उद्धव ठाकरेंनी 17-18 तास काम केलं.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Devendra Fadnavis : मी पुन्हा अडीच वर्षांनी आलो, पण दोन पक्ष फोडून आलो, जगाला उत्तर द्यावं लागतं : देवेंद्र फडणवीस