पुणे : सध्या लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Election 2024) धामधूम पाहायला मिळत आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात बऱ्याच मोठ्या हालचाली पाहायला मिळत आहे. अनेक पक्षांमध्ये राजीनामे आणि पक्षप्रवेश होत आहेत. विविध पक्षांमध्ये दिग्गज नेत्यांचं इनकमिंग आणि  आऊटगोइंग सुरु आहे. असं असनाच राज्यातील एक बडा नेता पुन्हा घरवापसी करणार असल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे एकनाथ खडसे (Eknath Khadse) पुन्हा घरवापसी भाजपात प्रवेश करण्यार असल्याचं सांगितलं जात आहे. अशातच आता एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशाला अजित पवारांचा अप्रत्यक्ष दुजोरा आहे. 


एकनाथ खडसे भाजपच्या वाटेवर


एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशाच्या वृत्ताला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अप्रत्यक्षपणे दुजोरा दिला आहे. यावेळी अजित पवार प्रतिक्रिया देताना म्हणाले की, बरेच दिवस त्यांची घालमेल सुरू होती, आता त्यांना निर्णय घ्यावसं वाटलं. 


खडसेंच्या भाजप प्रवेशाला अजित पवारांचा अप्रत्यक्ष दुजोरा


जागावाटपा बाबत बोलताना अजित पवार यांनी सांगितलं की, काही जागा ठरवण्याबाबत विलंब लागतो, आघाडी असेल किंवा महायुती असेल तरी काही जागा निश्चित करण्यामध्ये विलंब लागत असतोच. पण, लवकरच याबाबत निर्णय होईल, असं अजित पवार यांनी स्पष्ट केले. पिंपरी चिंचवडमध्ये थेरगाव येथे रुग्णालयाच्या उद्घाटनासाठी आले असता अजित पवार  पत्रकारांशी बोलत होते. 


लवकरच जागावाटपाचा तिढा सुटणार?


उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असेल तोपर्यंत जागावाटपाचा तिढा सुटेल अशी मिश्किल टिप्पणी ही अजित पवार यांनी केली. प्रवीण माने हा मूळचा माझाच कार्यकर्ता असल्याचं सांगत माने यांच्या अजित पवार गटातील प्रवेशाला अजित पवार यांनी एक प्रकारे दुजोराच दिला. मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी महायुतीतील सर्वजण घड्याळ धनुष्यबाण आणि कमळ या चिन्हावरील उमेदवारांच्या विजयासाठी प्रयत्न करतील असंही ते म्हणाले. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Sanjay Raut on Hasan Mushrif : शाहू महाराजांचा पराभव करण्यासाठी मुश्रीफांनी विष्णूच्या 13 व्या अवताराला बोलवावं, संजय राऊतांकडून जशास तस उत्तर