Devendra Fadnavis : मी पुन्हा येईल ही सिंगल लाईन कधीच नव्हती. मी पुन्हा येईल याबद्दल बऱ्याच गोष्टी होत्या. मी काय करेल हे सगळ सविस्तर सांगितल होतं. मी पुन्हा येईल, तर मी आलोच. जरासा वेळ लागला पण मी आलो तर दोन्ही पक्ष फोडूनच आलो. माझा मूळ स्वभाव हा संयमी आहे. उत्तर द्यावं लागतच पण, वेळ पाहावी लागते. योग्य वेळी उत्तर दिलं तर जग तुमचं उत्तर ऐकत, असे स्पष्टीकरण राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पहिल्यांदाच दिले आहे. 


राहुल गांधी (Rahul Gandhi) मुंबईत सभा घेत असताना काँग्रेस न होती तो क्या होता या पुस्तकाचे आज प्रकाशन राज्याचे उपमख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत आयोजित करण्यात आली. यावेळी फडणवीसांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले आहे. 


देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मी पुन्हा येईन हे वाक्य नव्हतं. त्यात मी कोणासाठी पुन्हा येईन, काय काम करेन? हे सगळं होतं. पण, हे एक वाक्य खूप प्रसिद्ध झालं. लोकांनी आम्हाला निवडून दिलं पण, उध्दव जी (Uddhav Thackeray) यांनी स्वार्थासाठी पाठीत खंजीर खुपसला. आम्ही पुन्हा आलो तेव्हा कौतुक झालं. नव्हतो आलो तेव्हा टीका झाली, हे होत राहतं. पुन्हा यायला अडीच वर्षे लागली पण, जेव्हा आलो तेव्हा दोन पक्ष तोडून आलो. 


आम्ही तिसऱ्यांदा निवडून येऊ


400 पार मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत. त्यांनी असं म्हटले आहे की, आम्ही शिवरायांना मानणारे लोक आहोत. शिवरायांचा राज्याभिषेक झाला तेव्हापासून एकदाही गादीची मजा घेतली नाही. त्यांनी राज्याभिषेक फक्त यासाठी केला की, जगाला कळावे की, आम्ही गुलामीतून बाहेर आलोय. मोदीजी सुद्धा हेच म्हणाले की, आम्हाला सुद्धा विश्वास आहे की, आम्ही तिसऱ्यांदा निवडून येऊ. पण, सत्तेसाठी नाही तर, लोकांसाठी हा विश्वास आहे. अहंकार नाही. मोदीजी यांना विश्वास दिसतो आहे.


काँग्रेस नसती तर भारताचे विभाजन झाले नसते


देवेंद्र फडणवीस म्हणाले की, काँग्रेस (Congress) नसती तर भारताचे विभाजन झाले नसते. काँग्रेस नसते तर दुराचार, अत्याचार आणि भ्रष्टचार झाला नसता. राज्यात  ३० ते ४० वर्षापूर्वी एका घराण्यापुरते राजकारण असायचं. आधी काही बाहुबली होते. पण आता ते बदलले आहे. देश कदाचित आताच विकसित झालेला असता. सांस्कृतिक दृष्ट्या देश पुढे असला असता. 370 सारख्या चुका झाल्याचं नसत्या, अशी टीका त्यांनी यावेळी केली. 


गुंडांच्या व्यतिरिक्त राजकारण होऊ शकतं हे आम्ही दाखवलं


महाराष्ट्राचं राजकारण हे गलिच्छ मानलं जातं. त्याचे कारण म्हणजे आतापर्यंत पक्षांनी पॉवर मन, गुन्हेगारांना संधी दिली होती. यावर देवेंद्र फडणवीस विचारले असता ते म्हणाले की, सत्तेतून पैसा, पैशातून ताकद आणि त्यातून सत्ता असं राजकारण सुरू होतं. सुरुवातीच्या काळातील राज्यातील राजकारण पाहिलं तर, 50 परिवार आहेत ज्यांच्या भोवती हे राजकारण फिरत राहिलं. काही परिवार असे होते की ज्यांनी समाजकार्य सुद्धा केलं. पण, काहींनी नाही. बाहुबली, गुन्हेगार यांची गरज भासू लागली आणि मग या सर्वांचा प्रवेश होऊ लागला. पण, 2014 नंतर पंतप्रधानांनी देश आणि महाराष्ट्र दोन्हीकडील राजकारणाचे चित्र बदललं आहे. ही व्यवस्था तोडण्याच काम त्यांनी केलं आहे. मी हे म्हणू शकतो की, आपण हे करू शकलो कारण, मोदीजी यांचं नेतृत्व आमच्या मागे होतं. गुंडांच्या व्यतिरिक्त राजकारण होऊ शकतं हे आम्ही मागच्या 10 वर्षात दाखवलं आहे. 100 टक्के यश मिळालं असं नाही. पण, काम सुरु आहे. आणखी पुढे जायचं आहे.


पैशांच्या जीवावर राजकारणालाच काँग्रेसने प्रमाण मानले


परिवार वाद हा मोठा प्रश्न आहे. ते हटवण्यासाठी तुम्ही मोठे प्रयत्न केले आहेत. असे विचारले असता ते म्हणाले की, मला अस वाटत की, राज्य किंवा देश असेल. एक ऑर्डर असते. काँग्रसने राजकीय नियम तयार केले आणि तेच प्रमाण मानले जात होते. परिवार वाद, पैशांच्या जोरावर राजकरण यालाच काँग्रेसने प्रमाण मानलं होतं. त्यावेळी भाजप एकमेव पक्ष होता ज्यांनी स्वतः ची ऑर्डर तयार केली. आता अनेक पक्ष आमची ऑर्डर (नियम) स्वीकारत आहेत. परिवार वाद म्हणजे राजकारण्यांचे नातेवाईक राजकारणात यावे. पण, आपल्या सामर्थ्यावर यावेत. सामर्थ्य असलेल्या व्यक्तीला डावलून नातेवाईकाला संधी देणं म्हणजे परिवार वाद होय, असे त्यांनी म्हटले. 


भविष्यात राजकारण्यांची मुलं राजकारणात दिसतील तर स्वतःच्या सामर्थ्यावर


आज खर्गे अध्यक्ष असेल तरी ते निर्णय घेऊ शकत नाहीत. निर्णय गांधीच घेतात. काल गृहमंत्री म्हणाले, राष्ट्रवादी का तुटली? कारण पक्ष पुतण्याला नाही. तर, मुलीला जाऊ द्या. शिवसेनेत आदित्यला आणण्यासाठी जेव्हा आयडॉलॉजी सोडली गेली तेव्हा मग पक्ष फुटला. ही लढाई मोठी आहे. यात फक्त, पक्ष नाही तर यांना निवडून देणारे सुद्धा दोषी आहेत, असं म्हणावं लागेल. मला विश्वास आहे की, भविष्यात राजकारण्यांची मुलं राजकारणात दिसतील तर स्वतःच्या सामर्थ्यावर असतील. 


आता चीनही डोळेवर करून बघत नाही


पंतप्रधान देशाचे संरक्षणाचे स्वप्न कसे पाहत आहेत? अशी विचारणा केली असता देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सुरक्षित तोच असतो जो बलवान असतो. आतापर्यंत मोदींनी जेव्हा पहिलं एअरस्ट्राईक केलं तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की, हा बदललेला भारत आहे. हे वार करतात. 26/11 रोजी ट्रायडंट, ताज हॉटेल हे निवडलेले ठिकाण होती. ते का? तर, त्यांना हे दाखवायचं होतं की, 10 लोक सुद्धा देशाला हलवू शकतात. मोदीजी आल्यानंतर तेव्हा आपल्याला अमेरिकेने ज्या आतंकवाद्यांचा ॲक्सेस दिला नाही तो ॲक्सेस मिळवला. देशात जसं सरकार चालतं तसं सरकार प्रदेशात चालतं. पाकिस्तान सोडाच पण, आता चीन सुद्धा डोळेवर करून बघत नाही, असे त्यांनी म्हटले आहे. 


विरोधक असेलच पाहिजेत पण...


इंडिया आघाडी आता एकत्र नाहीये. आता आरोप असा होतोय की, भाजप विरोधकांना ठेवताच नाही. तर, ही भाजपची जबाबदारी आहे का? आणि विरोधक नसतील तर, हा लोकशाहीवर घाला आहे का? असे विचारले असता देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सगळी इंजिन्स आपापल्या दिशेला जात आहेत. विरोधक असेलच पाहिजेत. पण, आम्ही विरोधक असताना आणि आताच्या विरोधकांमध्ये फरक आहे. हे असे लोक आहेत जे ऑर्डर बिघडवू इच्छित आहेत. ही कसली व्यवस्था आहे की, जेव्हा सुप्रीम कोर्ट त्यांच्या बाजूने निर्णय देईल तेव्हा योग्य आणि विरोधात दिला की, शिव्या देतात. विरोधकांमध्ये जी स्पेस निर्माण झाली आहे ती स्पेस असे लोक घेत आहेत. 


योग्य वेळी उत्तर दिलं तर जग तुमचं उत्तर ऐकतं


तुम्ही टीकेकडे दुर्लक्ष कसं करता? असे विचारले असता देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पहिली गोष्ट मला कोरं राजकारण येत नाही. राजकारण हीत राहतं. टीका, प्रतिटीका होत राहते. मी नेहमी प्रश्न विचारतो की, 25 वर्षे शिवसेनेने महापालिकेवर राज्य केलं. बराच काळ उद्धव जी स्वतः काम बघत होते. त्यांनी एक प्रोजेक्ट असा दाखवावा ज्याने मुंबईचं चित्र बदललं. पण मी दाखवू शकतो. धारावी, ट्रान्स हार्बर, नवी मुंबई विमानतळ. भारताच्या प्रगतीसाठी गुजरातचा मुख्यमंत्री देशात आला पाहिजे हे मोदींनी दाखवलं. त्यांच्या इतका संयम माझ्यात नसेल पण, मी शिकतोय. आपण ऋषी मुनी तर नाही. कधीतरी आपल्याला पालटून बोलावं लागतं तेव्हा बोलतो सुद्धा पण, माझा मूळ स्वभाव हा संयमी आहे. उत्तर द्यावं लागतच. पण, वेळ पहावी लागते. योग्य वेळी उत्तर दिलं तर जग तुमचं उत्तर ऐकतं, असे त्यांनी म्हटले आहे.


आणखी वाचा


लोकसभा लढवून दिल्लीत जाणार का?? देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं...