जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar Birthday) यांचा आज 84 वा वाढदिवस आहे. शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आज राज्यभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सहकुटुंब आज दिल्ली (Delhi) येथे शरद पवार यांची भेट घेत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. लोकसभेत देखील शरद पवारांचे वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन करण्यात आले. तर जळगावमध्ये शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आज राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जळगाव जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉ. सतीश पाटील (Dr Satish patil) यांनी आपल्या भाषणात पुष्पा (Pushpa) चित्रपटातील डायलॉग आणि जुने चित्रपटातील गाणे म्हणत जोरदार फटकेबाजी केल्याचे दिसून आले. 


जळगाव जिल्ह्याचे माजी मंत्री सतीश पाटील यांना एरंडोल विधानसभा मतदारसंघातून (Erandol Vidhan Sabha Constituency) राष्ट्रवादी शरद पवार गटातून उमेदवारी देण्यात आली होती. त्यांच्या विरोधात महायुतीतून शिवसेनेकडून अमोल पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात होते. तर हर्षल माने, डॉ. संभाजी पाटील, ए. टी. पाटील आणि अमित पाटील यांनी अपक्ष निवडणूक लढवली. एरंडोल विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे अमोल पाटील यांचा विजय झाला. तर सतीश पाटील यांना पराभवाचा सामना करावा लागला. मात्र, पराभवानंतरही आपण खचलेलो नाही, हे दाखविण्यासाठी सतीश पाटील यांनी पुष्पा चित्रपटातील 'झुकेगा नहीं साला', हा डायलॉग मारून उपस्थितांची मने जिंकली. 


सतीश पाटलांची 'पुष्पा'स्टाईल डायलॉगबाजी


सतीश पाटील म्हणाले की, मी 35 ते 40 वर्षांपासून राजकारणात आहे. अनेक जय पराजय बघितले आहेत. पण एक सांगतो की, जनतेने आपल्याला सोडले नाही, जनता आपल्या सोबत आहे. जळगाव जिल्ह्यात आपले चारही उमेदवार निवडून येतील, अशी स्थिती होती. परंतु, आपण षडयंत्राचा बळी ठरलो. या अडचणीच्या प्रसंगात आपण झुकता कामा नये म्हणत सतीश पाटील यांनी 'झुकेगा नहीं साला' असा 'पुष्पा'स्टाईल डायलॉग मारला. एवढेच नव्हे तर ये क्या हुआ, कब हुआ, कैसे हुआ, छोडो जाने भी दो, हे गाणे म्हणत त्यांनी निकालावरही मिश्किल टिप्पणी केली.   


इतर महत्त्वाच्या बातम्या 


Sharad Pawar Birthday : वाढदिवसाला शरद पवारांभोवती दुरावलेल्या आप्तेष्टांचा गोतावळा जमला, अजित पवारांच्या मुलाचं ट्विट, म्हणाला....


आता प्रति सरकार बनवा, शरद पवारांना 6 महिने पंतप्रधान करा, तर उरलेली साडेचार वर्ष राहुल गांधींना द्या, पडळकरांचा खोचक टोला