Sharad Pawar, Baramati : जैन समाजाचे महाराज आज (दि.11) बारामती येथे आले होते. यावेळी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी जैन मुनींचे दर्शन घेतले. मध्यप्रदेशहून बारामतीत विहारात आलेल्या महाराजांचे शरद पवारांनी दर्शन घेतले आहे. यावेळी युगेंद्र पवार देखील शरद पवारांसोबत हजर होते. 


शरद पवार आणि जैनमुनींमध्ये जैन धर्माविषयी चर्चा 


बारामतीतील महावीर भवन या ठिकाणी व्यापाऱ्यांचा मेळावा शरद पवार यांच्या उपस्थितीत होणार आहेत. तत्पूर्वी महावीर भवनमध्ये आलेल्या विशालसागरजी महाराज, धवलसागरजी व  उत्कृष्ट सागर महाराजांचे शरद पवारांनी नारळ देऊन व हात जोडून दर्शन घेतले. यावेळी त्यांनी जैन  धर्माविषयी महाराजांशी चर्चा केली. शरद पवार यांच्या गळ्यात स्वागताचा हार घालता. त्याच क्षणी पावसाला सुरुवात झाली त्यामुळे सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद पाहिला मिळाला.


पवार साहेब तुमचं शाकाहाराबद्दल मत काय ? जैन महाराजांचा प्रश्न 


बारामतीत जैन मुनींनी विचारलं पवार साहेब तुमचं शाकाहारी बद्दल मत काय ? असा प्रश्न केला. यावर प्रत्युत्तर देताना शरद पवार म्हणाले, आजकाल मी शंभर टक्के शाकाहारी आहे. याआधी मी शाकाहारी नव्हतो. परंतु मागच्या एका वर्षांपासून मी पूर्णतः शाकाहारी आहे, असं शरद पवार यांनी सांगितले. 


दुष्काळी दौऱ्यासाठी मी जेव्हा निघतो, तेव्हा पावसाची सुरुवात होते 


शरद पवार म्हणाले, आज आनंदाचा दिवस आहे. दुष्काळी दौऱ्यासाठी मी जेव्हा निघतो,तेव्हा पावसाची सुरुवात होते असा माझा अनुभव आहे. हे पावसासाठी चांगले वर्ष आहे. त्याचे परिणाम आपल्याला बघायला मिळतील. यंदा उत्तर प्रदेश साखर उत्पादन दोन नंबरला गेला. राज्य सरकारने शहाणपण दाखवले नाही. महाराष्ट्रामध्ये साखरेचे उत्पादन जास्त झालं. केंद्र सरकारने निर्बंध आणले. त्यांना मी सांगितले होते निर्बंध आणू नका.  मला सांगण्यात आले की, निवडणूक होईल पर्यत आम्ही तुमचे ऐकणार नाही, असंही शरद पवार यांनी सांगितलं. 






इतर महत्वाच्या बातम्या 


Eknath Shinde : संविधान बदलणार हे सांगण्यात आलं, 400 पार चा नारा देण्यात आला, लोकांनी डोक्यात ठेवलं; गडबड झाली : एकनाथ शिंदे