Eknath Shinde, Mumbai : "एक शेतकऱ्याचा मुलगा म्हणून शेतकऱ्यांचे विषय हाताळण्यासाठी नेहमी पुढे असतो. मी गावी जातो आणि शेती सुद्धा करतो. काही लोक म्हणतात की मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने जाऊन शेती करतात, पण वेळेचं बचत व्हावं यासाठी मी हेलिकॉप्टरने जातो. बांबूच्या शेतीसाठी सरकारने अनुदान देण्याचे ठरवलेलं आहे.  तापमान कमी करायचं असेल तर मोठ्या प्रमाणात झाडांची लागवड केली पाहिजे.  2022 ला बांबू लावला होता. यावेळी बांबू लावले नसते तर आज ही बैठकीला या ठिकाणी हजर नसतो.  सर्व प्रकल्प ठप्प झालेले होते.  एक विचारधाराची सरकार येणं गरजेचं होतं. या निवडणुकीत कांद्यामुळे आम्हाला थोडा त्रास झाला,थोडं मला रडवलं", असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत शेती पिक किमान आधारभूत किंमत निश्चितीसाठी केंद्रीय कृषी मूल्य व किंमत आयोगाची बैठक पार पडली. यावेळी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) बोलत होते. 


राज्यात पावसाला चांगली सुरुवात झालेली आहे


एकनाथ शिंदे म्हणाले, 2022 मध्ये बांबू लावणे गरजेचे होते म्हणून लावला. राज्यात बांबू लागवडीला प्रोत्साहन सरकार कसं देत आहे, यावर मुख्यमंत्री भाष्य करत होते.  राज्यात पावसाला चांगली सुरुवात झालेली आहे. निवडणुकीच्या काळात तापमान अधिक होतं. आजच्या  बैठकीचा विषय गंभीर होता,त्यामुळे मी स्वतः हजर राहिलो आहे.


मराठवाडा विदर्भात सोयाबीन आणि कापूस त्यामुळे थोडा त्रास झाला  


एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले, मराठवाडा विदर्भात सोयाबीन आणि कापूस त्यामुळे थोडा त्रास झाला. या सर्वांसाठी मी प्रावधान केलं होतं परंतु आचारसंहिता लागल्याने त्याचं वाटप करता आलं नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत याबाबत चर्चा केलेली आहे. काही भागात विरोधात निगेटिव्ह सेट केल्यामुळे आम्हाला नुकसान झालं. संविधान बदलणार हे सांगण्यात आलं 400 पार चा नारा सुद्धा देण्यात आला हे लोकांनी डोक्यात ठेवलं आणि गडबड झाली. शेतकऱ्यांना दुःखी ठेवून कोणी सुखी होणार नाही. त्यामुळे आमचे सरकार शेतकऱ्यांसाठी सर्व काही करत आहे. लवकर केंद्रीय कृषिमंत्री यांची वेळ घेऊन राज्यातल्या शेतकऱ्यांच्या समस्या मांडू, असे आश्वासनही शिंदे (Eknath Shinde) यांनी दिले. 



इतर महत्वाच्या बातम्या 


Bajrang Sonawane: लोक माझी लायकी विचारत होते, बीडच्या जनतेने माझी लायकी दाखवून दिली, शरद पवारांसमोर बजरंग सोनवणेंचं धगधगतं भाषण