Sharad Pawar On Sunetra Pawar: पुणे : लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) महाविकास आघाडीची (Maha Vikas Aghadi) सरशी झाली, तर महायुतीला (Mahayuti) अपेक्षित यश मिळालं नाही. महाराष्ट्राच्या (Maharashtra News) लोकसभा निवडणुकीत सर्वात लक्षवेधी लढत ठरली ती, बारामती लोकसभा मतदारसंघातील (Baramati Lok Sabha Constituency). बारामतीत (Baramati) यंदा नणंद-भावजयीमधली चुरस पाहायला मिळाली. राष्ट्रवादीतील (NCP) अंतर्गत फुटीनंतर दोन गट पडले. एक गट शरद पवार (Sharad Pawar) यांचा आणि दुसरा अजित पवार (Ajit Pawar) यांचा. बारामतीच्या रिंगणात शरद पवारांकडून सुप्रीया सुळे (Supriya Sule) यांना उतरवण्यात आलं होतं, तर अजित पवारांकडून सुनेत्रा पवारांना उमेदवारी देण्यात आली होती. महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या बारामतीच्या लढतीत सुप्रीया सुळेंनी विजय मिळवला. आता खुद्द शरद पवारांनी सुनेत्रा पवारांचा पराभव नेमका कसा झाला? याचं गणित भर पत्रकार परिषदेत मांडलं आहे.  


राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची पुण्यात पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवारांनी बारामतीत सुप्रीया सुळेंच्या विजयाचं गणित फक्त एकाच वाक्यात मांडलं आहे. अजित पवारांनी बारामतीत विकास केला, तरी लोकांनी तुम्हाला का निवडलं? एका माध्यम प्रतिनिधींनी शरद पवारांना पत्रकार परिषदेत बोलताना प्रश्न विचारला. त्यावर शरद पवार म्हणाले की, अरे ती बारामती आहे... शरद पवारांनी असं वाक्य उच्चारताच सभागृहात एकच हशा पिकला. 


शरद पवार बोलताना म्हणाले की, अरे ती बारामती आहे... (सभागृहात हशा) लोकांशी वैयक्तिक संबंध ठेवले पाहिजेत. याआधी मी फक्त शेवटची सभा घ्यायचो. मी 50 टक्के लोकांना नावानं ओळखायचो. पण आता जुनी लोकं नाहीत. मला खात्री होती की, लोक सुप्रियाला निवडून देतील.


दरम्यान, अजित पवारांना घरात स्थान, मात्र पक्षात घ्यायचं की नाही याचा निर्णय कार्यकर्तेच घेतील, असं शरद पवारांनी म्हटलं आहे. पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत पवारांनी विविध विषयांवर वक्तव्य केलं. भुजबळांनी घेतलेली शरद पवारांची भेट, विधानपरिषद निवडणुकीत चुकलेली स्ट्रॅटेजी याची इनसाईड स्टोरीही पवारांनी मांडली. याचवेळी राज ठाकरेंना टोला मारण्याची संधीही त्यांनी सोडली नाही. 


पाहा व्हिडीओ : Sharad Pawar on Ajit Pawar: घरात सगळ्यांना जागा, पण अजित पवारांना...शरद पवार काय म्हणाले?



महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Video : राज ठाकरे 8,10 दिवसांनी, महिन्यांनी जागे झाले की उठतात आणि बोलतात; 'त्या' प्रश्नावर शरद पवारस्टाईल उत्तर, एकच हास्यकल्लोळ