Samajwadi Party Vidhansabha Election : समाजवादी पक्षानं (Samajwadi Party) महाराष्ट्रात महाविकास आघाडीसोबत (Mahavikas Aghadi) हातमिळवणी केली आहे. परंतू आगामी विधानसभा निवडणुकीत आपल्या पक्षाला पुरेसं प्रतिनिधित्व न मिळाल्यास महाराष्ट्रात आपण स्वबळावर लढू असा इशारा पक्षाध्यक्ष अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी गेल्या आठवड्यात दिला आहे. त्यामुळं समाजवादी पक्ष (Samajwadi Party) महाराष्ट्रात स्वबळावर निवडणूक लढणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. 


19 जुलैला मुंबईत समाजवादी पार्टीच्या खासदारांचा होणार सन्मान


दरम्यान, उत्तर प्रदेशमध्ये विजयी झालेले सर्व नवनिर्वाचित 37 खासदार आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आणि सत्कारासाठी मुंबईत येणार आहेत. लोकसभा निवडणुकीत समाजवादी पक्षाचे 37 उमेदवार  विजयी झाले आहेत. यानंतर सपा प्रत्येक राज्यात आपली ताकद वाढवण्याच्या दृष्टीने काम करत आहे. 19 जुलैला वांद्रे रंग शारदा येथे सर्व खासदारांचा समाजवादी पक्ष महाराष्ट्राच्या वतीने सत्कार केला जाणार आहे. तर आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक आणि मुंबई महानगरपालिका निवडणुकीवर लक्ष केंद्रित करून मुंबईतील आपल्या व्होटबँकेला अधिक सक्षम करण्यासाठी समाजवादी पक्षाने या कार्यक्रमाचं आयोजन केल्याची चर्चा आहे. सपा खासदारांच्या मुंबई दौऱ्या दरम्यान अखिलेश यादव यांच्यासह सर्व खासदार चैत्यभूमी, गांधी संग्रहालय आणि छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दादर येथे भेट देणार आहेत.


समाजवादी पार्टीचा शक्तिप्रदर्शन करण्याचा प्रयत्न


आपल्या सर्व 37 खासदारांचा एकाच ठिकाणी सन्मान करुन शक्तिप्रदर्शन करण्याचा हा प्रयत्न असल्याचंही बोललं जात आहे. समाजवादी पक्षानं महाराष्ट्रात महाविकास आघाडीसोबत हातमिळवणी केली आहे. परंतू आगामी विधानसभा निवडणुकीत आपल्या पक्षाला पुरेसं प्रतिनिधित्व न मिळाल्यास महाराष्ट्रात आपण स्वबळावर लढू असा इशारा पक्षाध्यक्ष अखिलेश यादव यांनी दिलाय. त्यामुळं राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. दरम्यान, या खासदारांच्या दौऱ्यासंदर्भात आज अबू आजमी 3 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत.


पुढच्या काही महिन्यातच महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होणार


दरम्यान, पुढच्या काही महिन्यातच महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय घडामोडींना वगआला आहे. सर्वच राजकीय पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे. अनेक राजकीय नेत्यांच्या गाठीभेटी सुरु आहेत. त्यामुळं राजकीय चर्चांना उधाण आल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच आता समाजवादी पार्टी देखील विधानसभेची निवडणूक स्वबळावर लढवण्याची चर्चा सुरु झाली आहे. 


महत्वाच्या बातम्या:


Abu Azmi : अबू आझमींनी घेतली अजित पवारांची भेट; दोघांमध्ये तासभर चर्चा; अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेशाबाबत शिक्कामोर्तब?