Gadchiroli News गडचिरोली : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis)यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. आज गडचिरोली जिल्ह्यातील वडलापेठ गावात सूरजागड इस्पात या लोह पोलाद कारखान्याचा भूमिपूजन पार पडणार आहे. तब्बल 10,000 कोटी रुपयांची गुंतवणुकेतून तयार होणाऱ्या या लोह पोलाद कारखान्याचे भूमिपूजन आज राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह उद्योग मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांच्या प्रमुख उपस्थीत हा भूमिपूजन सोहळा पार पडणार आहे.
आतापर्यंत महाराष्ट्रातील (Maharashtra News) शेवटचा जिल्हा म्हणून गडचिरोली (Gadchiroli) ओळखलं जात होता. पण आता गडचिरोली शेवटचा नाहीतर पहिला जिल्हा असेल. सोबतच सुरजागड इस्पातमुळे 7000 रोजगार निर्माण होऊन गडचिरोली जिल्हा स्टील उत्पादनाचे केंद्र बनेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलताना व्यक्त केला आहे. हा स्टील प्रकल्प विशेषत: विदर्भ आणि गडचिरोलीसाठी ही मोठी उपलब्धी असल्याचेही बोलल्या जात आहे आहे. मात्र या सूरजागड इस्पात या लोह पोलाद कारखान्याचे नेमकं वैशिष्ट्य काय हे आपण जाणून घेऊ.
सूरजागड येथील खणीचे महत्त्व काय?
सुरजागड मधील लोह खनिज छत्तीसगड आणि ओडिसाच्या धर्तीवर देशातील सर्वोत्तम लोहखनिजाच्या तोडीस तोड आहे. भारतात लोहपोलादाचा (steel ) सर्वात मोठा बाजार महाराष्ट्र, गुजरात आणि कर्नाटकात आहे. त्यामुळे छत्तीसगड आणि ओडिसाच्या खाणींच्या तुलनेत सुरजागडची खाण स्ट्रेटेजिकली अचूक ठिकाणी आहे. परिणामी येणाऱ्या काळात त्याचाच मोठा फायदा महाराष्ट्रातील लोह पोलाद प्रकल्पांना मिळेल. आणि गडचिरोली जिल्हाच नव्हे, तर संपूर्ण विदर्भ स्टील उत्पादनाचा हब बनेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
सुरजागड लोह खाण आणि त्यावर आधारित कारखाने केव्हा काय घडले?
# 1960 पासून खनिज संशोधन संस्थांच्या अहवालात सूरजागड मध्ये उच्च प्रतीचा लोह खनिज ही माहिती उपलब्ध होती.
# मात्र, गडचिरोलीतील नक्षलवादामुळे तिथे पाय ठेवणे ही शक्य नव्हते. त्यामुळे 2015 पर्यंत एक ग्रॅम लोह खनिज ही काढता आले नाही.
# दरम्यान 2012 लॉयड्स मेटल्स या कंपनीचे वरिष्ठ मॅनेजर धिल्लन यांची नक्षलींनी हत्या केल्याने दहशत निर्माण झाली होती.
# 2015 मध्ये राज्य सरकारने सुरजागड मध्ये लोह खनिजाच्या उत्खननाचा निर्णय घेतला आणि लॉयड्स मेटलस या कंपनीने उत्खनन करणे सुरू केले.
# मात्र, काम सुरु होताच 23 डिसेंबर 2016 मध्ये नक्षलवाद्यांनी सुरजागड जवळ कंत्राटदारांच्या शंभर पेक्षा जास्त गाड्या जाळून टाकल्या आणि पुन्हा एकदा काम थांबले.
# 2018 मध्ये पुन्हा एकदा लॉयड्स मेटल्स ने उत्खनन सुरू केले.
# 16 जानेवारी 2019 मध्ये लोख खनिज घेऊन जाणारे ट्रकचा गुरुपल्लीला अपघात होऊन चार जणांचा मृत्यू होऊन मोठ्या संख्येने ट्रकची जाळपोळ झाली होती, पुन्हा एकदा लोह खनिज उत्खनन आणि वाहतुकीचे काम थांबले होते.
# दरम्यानच्या काळात सुरजागड सुरक्षित करण्यासाठी पोलिसांनी खास रणनीती राबविली. सर्वात आधी सुरजागडच्या अवतीभवती हेडरी, येलचिल, अलदांडी, पिपली बुर्गी आणि सुरजागड या ठिकाणी नवे पोलीस मदत केंद्र उभारले. संपूर्ण परिसरात नक्षलवाद्यांचा नाही तर पोलिसांचा दबदबा निर्माण झाला आणि सुरजागड नक्षलवाद्यांच्या नियंत्रणातून मुक्त झाले.
# 2021 मध्ये सुरजागड खाणीतून पूर्ण क्षमतेने लोह खनिज उत्खननाला सुरुवात झाली.
# 2017 मध्ये गडचिरोली जिल्ह्यातील कोनसरी येथे लॉयड्स मेटल्सने आयरन स्पॉन्ज तयार करणारा कारखान्याचा भूमिपूजन केले. सूरजागड येथील लोह खनिज
खाणी आधारित पहिला स्थानिक कारखाना ठरला.
# 2024 च्या सुरुवातीला लॉयड्स मेटल्सच्या कोनसरी येथील आयरन स्पॉंज कारखानातून उत्पादनाला सुरुवात झाली.
# तर आज वडलापेठ येथे आयरन स्पॉन्ज तयार करणारा कारखाना अस्तित्वात येत आहे. त्याचे आज भूमिपूजन होऊन कारखान्याची उभारणी होऊन पुढील काही महिन्यांत उत्पादन सुरू होईल.
इतर महत्वाच्या बातम्या