नाशिक : शांतिगिरी महाराज (Shantigiri Maharaj) यांनी पहिल्याच दिवशी नाशिक लोकसभा मतदारसंघातून (Nashik Lok Sabha Election) अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. शांतिगिरी महाराज (Shantigiri Maharaj) यांनी सुरवातीला भाजपकडून निवडणूक लढविण्याची तयारी केली होती. मात्र कुठलाही प्रतिसाद न मिळाल्याने आज अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. 29 तारखेला पुन्हा शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.


निवडणूक अधिकाऱ्यांकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात शांतिगिरी महाराजांकडे 38 कोटी 81 लाख इतकी संपत्ती असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्याच्याकडे विविध ठिकाणी मठ, गुरुकुल, शेती आणि वाहने असल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले आहे.


शांतीगिरी महाराज यांनी सादर केलेला तपशील खालीलप्रमाणे, 



  • शांतीगिरी महाराजांकडे एकूण 38 कोटी 81 लाख 53 हजार 533 रुपयांची स्थावर आणि जंगम मालमत्ता आहे. 

  • शांतीगिरी महाराज यांच्याकडे 9 वाहने असून त्यांच्यावर 75 हजारांचे कर्ज आहे. विविध ठिकाणी मठ, गुरूकुल, शेती आणि निवासी मालमत्ता आहे.

  • शांतीगिरी महाराजांजवळ 71 लाख 68 हजार 664 रूपयांची जंगम मालमत्ता आहे. त्यामध्ये 67 लाख 91 हजार 486 रुपये मूल्याच्या 9 वाहनांचा समावेश आहे.

  • सफारी, टेम्पो, पिकअप, दोन स्कूलबस, टाटा 407, हायवा, एसयूव्ही, टीयूव्ही अशी विविध वाहने त्यांच्याकडे  आहे. 

  • तसेच 12 बँक खात्यात 70 हजार 458 रूपयांची रक्कम असून 50 हजार रुपये कॅश स्वरूपात आहे. 

  • एफडी आणि विमा पॉलिसीचे मूल्य 2 लाख 56 हजार 720 रुपये आहे. 

  • स्थावर मालमत्तेत 53 ठिकाणी वारसा हक्क आणि स्वमालकीची शेतजमीन असून निवासी संकुलाचाही समावेश आहे. त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील

  • वेरुळ, कन्नड, खुलताबाद, नाशिक जिल्ह्यातील सिन्नर, नगर जिल्ह्यातील कोपरगाव आदी ठिकाणी या मिळकती आहे. शेकडो एकर क्षेत्राचा यात समावेश आहे. 

  • शांतीगिरी महाराजांच्या नावावर एकही  गुन्हा दाखल नाही.


आजन्म ब्रह्मचारी राहण्याचं व्रत


वेरुळ मठाचे मठाधिपती असलेले शांतीगिरी महाराज हे मूळचे नाशिक जिल्ह्यातील लाखलगावचे आहे. लाखलगाव येथील शाळेतून 1976 साली एसएससीची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. 1989 साली जनार्दन स्वामी यांचे निर्वाण झाल्यानंतर 25 डिसेंबर 1989 साली शांतीगिरी महाराजांची उत्तराधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली. 


शांतीगिरी महाराज हे संन्यस्त स्वीकारलेले साधू आहेत. आजन्म ब्रह्मचारी राहण्याचं त्यांनी व्रत घेतलं आहे. 2009 मध्ये संभाजीनगरमधून निवडणूक लढविणारे शांतिगिरी महाराज 2024 मध्ये नाशिक लोकसभा मतदारसंघातून निवडणूकीच्या मैदानात उतरले आहेत.


ही बातमी वाचा: