North Central Mumbai Loksabha : उत्तर मध्य मुंबई लोकसभा (North Central Mumbai Loksabha) मतदारसंघातून काँग्रेस पक्षाने वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांना उमेदवारी जाहीर केलीये. मात्र, वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांना उमेदवारी दिल्याने काँग्रेस नेते नसीम खान नाराज झाले आहेत. मला तयारी करायला सांगितली होती, मात्र अचानक असं काय झाल की, मला उमेदवारी दिली नाही, असा सवाल नसीम खान यांनी केला आहे. 


काय म्हणाले नसीम खान?


लोकसभा उमेदवारीबाबत बोलताना नसीम खान म्हणाले, उत्तर मध्य मुंबईतून मला तयारी करायला सांगितली होती. मात्र, अचानक काय झालं मला माहित नाही. माझी नाराजी आहे. महाराष्ट्रात एकही काँग्रेसचा मुस्लिम उमेदवार नाही. मतदान मुस्लिम समाजाचे पाहिजे मग उमेदवार का नाही, असा प्रश्न समाज मला विचारेल त्यांना मी काय सांगणार? उत्तर मध्य मुंबईत प्रचार करायचा की, नाही याचा निर्णय मी घेईल. माझी जी काही नाराजी आहे, ती मी दिल्लीत पक्षश्रेष्ठींना कळवलेली आहे. 


वर्षा गायकवाड यांना दिल्लीत पाठवण्याचा उद्धव ठाकरेंचा निर्धार 


काँग्रेसकडून वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. वर्षा ताईंना दिल्लीत पाठवणार आहोत. देशात हुकूमशाही येऊ देणार नाही. राज्यघटना बदलू देणार नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. महाविकास आघाडी वर्षा गायकवाड यांना विजयी करण्यासाठी एकजूट झाली असताना काँग्रेसमध्ये नाराजी नाट्याला सुरुवात झाली आहे. वर्षा गायकवाड नसीम खान यांची नाराजी दूर करण्यासाठी काय करणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Lok Sabha Election 2024: धक्कादायक! मतदान न करताच बोटाला शाई लावा अन् पैसे मिळवा; शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्याने केला पर्दाफाश