Nashik Lok Sabha Constituency : नाशिक लोकसभा मतदारसंघाची निवडणूक 20 मे रोजी पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर आजपासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. नाशिक लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेले शांतीगिरी महाराज (Shantigiri Maharaj) यांनी पहिल्याच दिवशी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. 


शांतीगिरी महाराज हे महायुतीतून (Mahayuti) लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election 2024) लढवण्यासाठी इच्छुक होते. यासाठी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेटदेखील घेतली होती. महायुतीतून शांतीगिरी महाराज निवडणूक लढवणार, अशी चर्चा काही दिवसांपूर्वी सुरु होती. मात्र शांतीगिरी महाराजांचे नाव मागे पडले. 


शांतीगिरी महाराजांनी दाखल केला उमेदवारी अर्ज


यानंतर शांतीगिरी महाराजांनी नाशिकमधून अपक्ष लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्धार केला. निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याआधी त्यांनी आठ दिवसांचे अनुष्ठान देखील केले होते. अनुष्ठानाच्या सांगतेवेळी त्यांनी त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar) येथे जोरदार शक्तीप्रदर्शन केले. त्यानंतर नाशिक शहरात बाबाजी परिवाराकडून बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यात एक हजाराहून अधिक बाईक घेऊन त्यांचा भक्त परिवार सहभागी झाला होता. आज अखेर शांतीगिरी महाराजांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. ते नाशिकमधून अपक्ष निवडणूक लढवणार आहेत. 


पत्रक जारी करत शांतीगिरी महाराजांकडून महायुतीला इशारा 


दरम्यान, नुकताच शांतीगिरी महाराजांनी आपली ताकद काय आहे? हे सांगत एकप्रकारे महायुतीच्या नेत्यांनाच इशारा दिला होता. त्यांनी एक पत्रक जारी केले होते. या पत्रात म्हटले होते की, 



  • 1 लाख 80 हजार कुटुंबांच्या भक्तपरिवाराचे सुमारे 4 लाख फिक्स मतदान.

  • जळगाव, धुळे, नंदुरबार, सटाणा, कळवण, मालेगाव, निफाड, चांदवड, नगर, संभाजीनगर यासारख्या अनेक भागातील भक्त परिवाराचे नाशिकमधील नातेवाईकांचे मतदान.

  • जातीय समीकरण मोडून काढण्याची ताकद असलेला 18 पगड जाती आणि बारा बलुतेदारांचा जय बाबाजी भक्तपरिवार.

  • शांतीगिरी महाराज यांची स्वच्छ प्रतिमा.

  • खिसे नसलेलं, निस्वार्थ, निष्काम असं ब्रम्हचारी व्यक्तिमहत्व.

  • 7 लोकसभा मतदारसंघात असेलला मोठा प्रभाव.

  • 16 विधानसभा मतदारसंघात निर्णायक भूमिका.

  • सर्वपक्षीय मोठ्या नेत्यांसोबत असलेले जिव्हाळ्याचे संबंध.

  • नाशिकसाठी निधी खेचून आणण्याची ताकद.

  • अंतर्गत कलहामुळे अनेक पक्षांचे लोकं आतून शांतीगिरी महाराज यांचे काम करण्याची शक्यता.

  • अंजनेरी, कुंभमेळा व इतर धार्मिक मुद्यांवर असलेला प्रभाव.


इतर महत्वाच्या बातम्या


Shantigiri Maharaj : नाशिकच्या जागेवरून महायुतीत तिढा कायम असतानाच शांतीगिरी महाराजांचं मोठं वक्तव्य, म्हणाले...


Dindori Lok Sabha : आता माघार नाहीच! माकपच्या जे पी गावितांनी भरला उमेदवारी अर्ज, दिंडोरीत महाविकास आघाडीत बिघाडी