Mumbai : गणपत गायकवाड ज्या जिल्ह्यातील आमदार आहेत, त्या जिल्हाचा मी पालकमंत्री आहे, असे म्हणत मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी दंड थोपटले आहेत. मंत्रीमंडळ बैठकीपूर्वी शिंदे गटाच्या आमदारांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतली. यावेळी भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याबाबत तथ्यहीन आरोप करण्यासंदर्भात नाराजी व्यक्त केली. मंत्रीमंडळ बैठक पार पडल्यानंतर मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते.
आमदार गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad) यांच्यावर कारवाई करण्याची मागणी आम्ही केली आहे. मी ठाण्याचा पालकमंत्री आहे. यापूर्वी एकदाही गणपत गायकवाडांनी (Ganpat Gaikwad) त्यांचा विषय कधीच मांडला नाही. समन्वय समिती समोरही मांडला नाही, असे शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) म्हणाले आहेत. शंभूराज देसाई म्हणाले, देवेंद्र फडणवीस आमच्या मागणीची योग्य ती दखल घेतील. आम्हाला याबाबत खात्री आहे. मराठा आंदोलनासंदर्भात लवकरच मार्ग निघेल. मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी आंदोलनाची भूमिका घेऊ नये, असे आवाहनही त्यांनी केले.
मंत्री छगन भुजबळ आज (दि.5) मंत्रिमंडळ बैठकीत उपस्थित होते. आज मराठा आरक्षणावरून त्यांनी कुठलाही आक्षेप नोंदवला नाही. भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाच्या आमदारावर गोळीबार केला होता. त्यानंतर सातत्याने त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी शिंदे गटाकडून केली जात आहे. दरम्यान, गोळीबार केल्यानंतर गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यालाही शंभूराज देसाई यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
मंत्रीमंडळ बैठकीत मोठे निर्णय
राज्य मंत्रिमंडळाने सोमवारी पार पडलेल्या बैठकीत मोठे निर्णय घेतले आहेत. मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळालाय. मुंबईतील मालमत्ता करात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. त्याशिवाय सरकार दोन लाख रोजगारांच्या संधी उपलब्ध करणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.या मंत्रिमंडळ बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री आणि मंत्री शंभूराजे देसाई (Shambhuraj Desai) उपस्थित होते.
इतर महत्वाच्या बातम्या