Ulhasnagar Firing Case : उल्हासनगरमधील गोळीबार (Ulhasnagar) प्रकरणात मोठी अपडेट समोर येत आहे. भाजप आमदार (BJP) गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad) यांच्याकडून शिंदे गटाचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड (Mahesh Gaikwad) गोळीबार करण्यात आला होता. हिललाईन पोलीस स्टेशनमध्येच वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या कॅबिनमध्येच हा गोळीबार झाला होता. या प्रकरणाची माहिती विधीमंडळाला प्राप्त झाली आहे, तर गायकवाडांना कोर्टाने शिक्षा ठोठावल्यानंतर पुढील कारवाई होणार असल्याची माहिती मिळत आहे.


 


शिवसेनेचे मंत्री आक्रमक


भाजप आमदार गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणावरून शिवसेनेचे मंत्री आक्रमक झाले आहेत. या प्रकरणी शिवसेनेच्या 7 मंत्र्यांनी देवेद्र फडणवीसांची भेट घेतली आहे. गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्र्यांबद्दल केलेल्या वक्तव्याबद्दल मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली असून देवेद्र फडणवीसांनी तातडीनं गणपत गायकवाड यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी आक्रमक भूमिका शिवसेनेच्या मंत्र्यांनी मांडली आहे.


 



 


 


जमिनीच्या वादातून घडला होता प्रकार


भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला आणि  काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ आता समोर आला.  गोळीबारप्रकरणी गणपत गायकवाडसह तीन जणांना अटक करण्यात आली. हा सर्व प्रकार जमिनीच्या वादातून घडला होता. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी वरिष्ठ स्तरावर चौकशीचे आदेश दिले होते, तसेच याबाबत डीजींना आदेश देण्यात आल्याची माहिती फडणवीसांनी दिली होती. 


 


दोन्ही गटात 'सोशल वॉर'...


गोळीबार करणारे भाजप आमदार गणपत गायकवाड आणि जखमी झालेले शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड या दोघांना मानणारा मोठा गट आहे. दोन्ही नेत्यांचे समर्थक या घटनेनंतर आक्रमक होतांना पाहायला मिळाले होते. अशात गोळीबाराचा व्हिडिओ देखील समोर आला. त्यानंतर दोन्ही गटाकडून आता सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांना उत्तर देण्यात येत आहे. फेसबुक, इंस्टाग्रामवर दोन्ही गटाचे कार्यकर्ते आपल्या नेत्याचे फोटो आणि रील्स व्हायरल करत आहेत. विशेष म्हणजे या रील्सला वेगवेगळ्या चित्रपटातील गाणे आणि डायलॉग जोडले जात आहे. त्यामुळे सोशल मीडियावरील वातावरण चांगलेच तापले आहे



काय आहे प्रकरण? 


एका 50 गुंठे जमिनीवरून वाद सुरु होता. दरम्यान, त्यानंतर हे प्रकरण थेट पोलीस ठाण्यात पोहचले. यावेळी गणपत गायकवाड यांचा मुलगा देखील पोलीस ठाण्यात होता. मात्र, पोलीस कारवाई करत नसल्याचा आरोप करत स्वतः गणपत गायकवाड पोलीस ठाण्यात पोहचले आणि त्यांनी थेट शिंदे गटाचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला. विशेष म्हणजे, "मी स्वत: पोलिसांसमोरच गोळी झाडली. मला याचा पश्चाताप नाही. कारण माझ्या मुलांना जर ते पोलिसांच्या समोर मारत असतील, तर मग मी काय करणार. पोलिसांनी मला पकडलं. त्यामुळेच तो वाचला. मी त्यांना जीवे मारणार नव्हतो. पण पोलिसांच्या समोर जर असं कोणी करत असेल, तर आत्मसंरक्षणासाठी हे करणं गरजेचं असल्याचं गणपत गायकवाड म्हणाले होते.


 


हे ही वाचा>>


मोठी बातमी! एकनाथ खडसेंची मालमत्ता शासनाने ताब्यात घेतली, लिलाव होण्याची शक्यता; गिरीश महाजनांची माहिती