India Presidential Election : राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत विरोधी पक्षांकडून बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे उमेदवार असू शकतात, अशी चर्चा असताना एक मोठी बातमी समोर येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेश निवडणुकीनंतर नितीश कुमार भाजप आघाडीपासून म्हणजेच एनडीएपासून वेगळे होण्याचा विचार करत आहेत. याबाबत ते लवकरच निर्णय घेऊ शकतात. निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी अलीकडेच तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव (KCR) आणि नितीश कुमार यांची भेट घेतली आहे. या सर्व घडामोडींवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे लक्ष ठेवून आहेत.  


नितीश कुमार यांच्यावरून उपस्थित झालेले प्रश्न



  • एनडीएच्या ऐक्याला विरोधकांनी खीळ बसवली आहे का?

  • राष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा प्रचार यशस्वी होणार का?

  • 10 मार्च रोजी होणारे निवडणूक निकाल कोणाचे भवितव्य ठरवणार?


नितीश कुमार यांच्या नावाची चर्चा का?  


या महिन्यात केसीआर आणि प्रशांत किशोर यांच्या भेटीनंतर नितीश कुमार यांना राष्ट्रपती बनवण्याच्या चर्चेला उधाण आलं. तेलंगणा निवडणुकीत प्रशांत किशोर यांची टीम केसीआर यांच्या टीआरएस पक्षासाठी काम करणार आहे. दोन दिवस चाललेल्या या बैठकीत नितीश यांना राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत उमेदवार बनवण्याबाबत प्रदीर्घ चर्चा झाली. यानंतर नितीश आणि प्रशांत किशोर पाटण्यात डिनरवर भेटले. तर रविवारी केसीआर यांनी मुंबईत शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. तत्पूर्वी आरजेडी नेते आणि बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनीही केसीआर यांची भेट घेतली.


दरम्यान, बिहारमध्ये नितीश यांचा पक्ष जेडीयू आणि भाजप यांचे युतीचे सरकार आहे. मात्र जातीनिहाय जनगणनेवरून जेडीयू आणि भाजपमध्ये वाद सुरू आहेत. या मुद्द्यावर आरजेडी नितीश यांच्यासोबत आहे. भाजपच्या विरोधात एवढा तगडा उमेदवार देण्याची विरोधकांची रणनीती पाहता काँग्रेसलाही नितीश कुमार यांना पाठिंबा देणे भाग पडू शकते. 


महत्त्वाच्या बातम्या: