Kirit Somaiyya :  भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी काही दिवसांपूर्वी नगरविकास खात्याच्या कार्यालयात जाऊन फाईल्स चाळल्याची छायाचित्रे नुकतीच सोशल मीडियावर (social media) व्हायरल झाली होती. त्यावर शिवसेना आमदार प्रताप सरनाईक  (Shivsena MLA Pratap Sarnaik) यांनी अनधिकृतरित्या आमचे फोटो काढले, आणि ते मिडियामध्ये व्हायरल केल्याबाबत त्वरित एफआयआर (FIR) दाखल करा, असे आरोप करत एक पत्र भाजपाचे किरीट सोमय्या यांनी मंत्रालयातील मुख्य सचिवांना लिहले आहे. पत्रात आणखी काय म्हणाले सोमय्या?


किरीट सोमय्यांचे मंत्रालयाला पत्र, सोमय्या म्हणतात...


मंत्रालयाच्या मुख्य सचिवांना हे पत्र लिहण्यात आले असून माझ्या सुरक्षा व्यवस्थेची करण्यात आलेली छेडछाड व शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांनी माझे फोटो काढून व्हायरल केले. या आशयाखाली हे पत्र लिहलंय


पत्रात लिहलंय की, " 24 जानेवारी 2022 रोजी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी माहिती अधिकार अधिनियम 2005 कायद्याचा भंग करून त्यांच्या अनधिकृत बांधकामाची फाईल पाहत असताना तेथे येणे, अनधिकृतरित्या आमचे फोटो काढणे, ते मिडिया मध्ये व्हायरल करणं हे आता सिद्ध झाले आहे.या संदर्भात मंत्रालयाने मला दि. 25 जानेवारी 2022 रोजी संदर्भ क. माअआ/टिपीएस-1222/03/22/नवि 12 या पत्रान्वये नोटीस दिली होती, 48 तासात उत्तर मागितले होते. मी विस्तृत उत्तर ही पाठविले होते व महाराष्ट्र सरकार, नगरविकास मंत्रालय, मंत्रालय सुरक्षा विभाग यांच्याकडे जाब ही मागितला होता."




सोमय्या पुढे म्हणतात, "वर्तमान सरकारनी या संदर्भात अजूनपर्यंत उत्तर दिले नाही परंतु, सीआयएसएफ गृह मंत्रालय, भारत सरकारनी मला 18 फेब्रुवारी 2022 च्या पत्र क्र. 663 या पत्राद्वार स्पष्ट केले आहे. "मंत्रालयात हे फोटो प्रताप सरनाईक यांनी काढले होते. सीआयएसएफ नी या संदर्भात अंतर्गत तपास,चौकशी केली. महाराष्ट्र सरकारकडून ही माहिती मागविली आणि ही घटना एक चिंतेची बाब आहे हे स्पष्ट केले आहे.माझ्या माहिती प्रमाणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्या दिवशी माझ्यावर एफआयआर करण्याची ताकीद दिली होती. आता प्रताप सरनाईक यांच्यावर एफआयआर केव्हा दाखल करणार हे मला कळवावे, ही विनंती." असे पत्र सोमय्यांनी लिहिले आहे.


अधिकाऱ्यांच्या खुर्चीवर बसून फाईल्स चाळतानाचा फोटो व्हायरल


किरीट सोमय्या (Kirit Somaiya) हे काही दिवसांपूर्वी मंत्रालयातील नगरविकास खात्याच्या कार्यालयात गेले होते. याठिकाणी ते अधिकाऱ्यांच्या खुर्चीवर बसून फाईल्स चाळतानाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोत नगरविकास खात्यातील अधिकारी किरीट सोमय्या यांच्यासमोर उभे असल्याचे दिसत आहे. यावरुन आता राजकारण रंगले आहे.


इतर महत्त्वाच्या बातम्या:



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha