Satej Patil and CM Eknath Shinde, कोल्हापूर : कोल्हापूरातील (Kolhapur) काँग्रेस पक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहे. मुख्यमंत्री ज्या हॉटेलमध्ये राहिले, त्या हॉटेलमध्ये काल रात्री 12 वाजता जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी भेटले, असा आरोप काँग्रेस नेते आणि माजी मंत्री सतेज पाटील (Satej Patil) यांनी केला आहे. शिवाय काँग्रेस मुख्यमंत्र्यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याची माहिती सतेज पाटील (Satej Patil) यांनी दिली आहे. रात्री 12 वाजता अधिकाऱ्यांना भेटत नावे काढून कारवाईच्या सूचना दिल्याचा आरोपही काँग्रेसकडून करण्यात येत आहे. 


सतेज पाटील काय म्हणाले ?  


मुख्यमंत्री (Eknath Shinde) ज्या हॉटेलमध्ये राहिले त्या हॉटेलमध्ये काल रात्री 12 वाजता जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी भेटले. या भेटीत काही नावे काढून कारवाई करण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्या. पंचशील हॉटेलमधील सीसीटिव्ही फुटेज चेक करण्याची निवडणूक आयोगाकडे मागणी करणार असल्याची माहितीही सतेज पाटील (Satej Patil) यांनी दिली आहे. त्यामुळे काँग्रेसने तक्रार केल्यानंतर निवडणूक आयोग कारवाई करणार का? याकडे सर्वांचे लक्ष आहे. 


एकनाथ शिंदेंचा पंचशील हॉटेलमध्ये मुक्काम 


कोल्हापूरातील (Kolhapur) महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा पार पडली. दरम्यान या सभेची एकनाथ शिंदे यांनीही जय्यत तयारी केली होती. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) कोल्हापूरच्या पंचशील हॉटेलमध्ये मुक्काम होती. शिवाय कोल्हापूरातून शिंदे (Eknath Shinde) यांनी त्यांची दोन्ही उमेदवार निवडून आणण्यासाठी ताकद पणाला लावली आहे.  संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांनी शिंदेंच्या बंडानंतर कायम त्यांना साथ दिली आहे. इतर काही खासदारांचे तिकीट कापण्यात आले असले तरी कोल्हापूरातील दोन्ही उमेदवार पुन्हा एकदा निवडणूकीच्या मैदानात उतरले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांनी देखील कोल्हापुरात तळ ठोकला होता. 


मोदींजी सभा झाल्यानंतरही शिंदेंचा कोल्हापूरात मुक्काम 


महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींनी कोल्हापूरात सभा घेतली. मात्र, सभा झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) कोल्हापुरात तळ ठोकून आहेत. एकनाथ शिंदे यांनी शनिवारीही रात्री उशीरापर्यंत बैठका घेतल्या होत्या. यावेळी त्यांनी महायुतीच्या नेत्यांशी संवाद साधत कोल्हापूरातील राजकीय परिस्थिती जाणून घेतली होती. 


इतर महत्वाच्या बातम्या 


CM Eknath Shinde: कोल्हापुरात गुप्त खलबतं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 4 तास हॉटेलच्या खोलीत बसून, भेटीगाठी ऐवजी फोनाफोनी!