Devendra Fadnavis on Chhagan Bhujbal, Sangola : महाराष्ट्रात एनडीएला 2014 आणि 2019 ची निवडणूक जेवढी सोपी गेली, यंदाची निवडणूक तेवढी सोपी नाही. गेल्यावेळी 48  पैकी 41 जागा जिंकल्या होत्या. मात्र, आता उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि शरद पवारांच्या (Sharad Pawar) बाजूने सहानुभूतीची लाट आहे. त्यामुळे 400 पारचा नारा देखील अडचणीत येण्याची शक्यता आहे, असं मत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी व्यक्त केलं होते. दरम्यान, छगन भुजबळांच्या वक्तव्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते सांगोल्यात बोलत होते. 


काय म्हणाले देवेंद्र फडणवीस? 


देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, आपण जिंकतो अशा अफवा सोडल्या तर कार्यकर्ते काम करतील, असं मविआच्या नेत्यांना वाटतं. दोन टप्प्यात महाराष्ट्रात महायुतीला प्रचंड मतदान झाले. मतदान झालेल्या जागा महायुती मोठे मताधिक्य घेऊन जिंकेल. छगन भुजबळ यांचे संपूर्ण वक्तव्य तुम्ही ऐकले नाही. त्यांनी मांडलेल्या मुद्द्यातील  एखादे वाक्य काढायचे आणि दिवसभर चालवायचे, असं काम काम मीडिया करत आहे, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी स्पष्ट केलं आहे. 


आम्ही आहोत म्हणजे तिजोरीच्या चाव्या तुमच्याकडे आहेत


पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, सांगोल्याला आलेल्या पाण्याचे खरं भागीरथ रणजित निंबाळकर आणि शहाजी बापू आहेत. महाराष्ट्रमध्ये कुठेही गेले तरी शहाजीबापू यांना सगळीकडे ओळखतात, असे स्टार आमदार शहाजी बापू आहेत. बापू म्हणाले निधीची गरज आहे. आम्ही आहोत म्हणजे तिजोरीच्या चाव्या तुमच्याकडे आहेत.  जोपर्यंत योजना पूर्ण होतं नाहीत तोपर्यंत निधीचा ओघ कमी होणार नाही. मी देखील समजायचो की, या भागतील दुष्काळला उपाय नाही, हा निसर्गाचा कोप आहे, पण मुख्यमंत्री झाल्यावर अभ्यास केलं आणि लक्षात आलं की काही मोठ्या नेत्यांनी पाणी अडवून ठेवलंय.  मोठे नेते अशा नेत्यांना आणायचे की, सर्व होऊ दे फक्त पाण्याचा प्रश्न नाही सुटला पाहिजे. पाणी केवळ त्यांच्या तिकडेच राहिलं पाहिजे.  पण त्यांच्या दुर्दैवाने मागच्या निवडणुकीत रणजितसिंह खासदार झाले, असंही देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी स्पष्ट केलं. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Devendra Fadnavis on Mohite Patil : शरद पवारांनी अडचणीत आणून यांचे राजकारण संपवले, तेव्हा आम्ही पाठिशी उभे राहिलो, देवेंद्र फडणवीसांचा मोहिते पाटलांवर हल्लाबोल