सातारा: नरेंद्र पाटलांना सत्तेमध्ये बसवताना मी मदत केलीय, आता त्यांनी जे काही आरोप केलेत त्याला माथाडी कामगारच उत्तर देतील असं राष्ट्रवादी शरद पवार गटाचे साताऱ्याचे उमेदवार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांनी म्हटलंय. आपल्यावर जे आरोप होतायत ते राजकीय आरोप आहेत असंही ते म्हणाले. शशिकांत शिंदे यांनी मोठे शक्तिप्रदर्शन करत त्यांचा उमेदवारी अर्ज (Satara Lok Sabha Election) दाखल केला. 


सातारा जिल्ह्यासाठी विकासाचे व्हिजन घेवून काम करणार आहे.मुतारी घोटाळ्याबाबत नरेंद्र पाटलांच्या टीकेला मी उत्तर देत नाही, माथाडी कामगार त्यांना उत्तर देतील. त्यांना सत्तेवर बसवताना मी सहकार्य केले होते. माथाडी कामगार सक्षम आहेत, कोणाचा मागे उभे राहायचे हे त्यांना कळतं. माथाडी कामगारांना छत्र आणि अधिकार शरद पवारांनी दिलं आहे. जे आरोप माझ्यावर होतायत ते सगळे राजकीय आहेत. त्याबाबत न्यायालयात जे होईल ते मला मान्य आहे.राजकारणात कूटनीती होत असते हा त्याचाच भाग आहे.


शशिकांत शिंदे विक्रमी मतांनी विजयी होतील


राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, आजची गर्दी ही विजयाची नांदी आहे. महायुतीला अजून त्यांचा उमेदवार ठरवता येत नाही.खोटे नाटे आरोप करून इडी , सीबीआयची  भीती दाखवण्याचा प्रयत्न सुरू आहे या धमकीला जिल्ह्यातील लोक भीक घालणार नाही. शशिकांत शिंदे विक्रमी मतांनी विजयी होतील


साताऱ्याची जागा कुणाला अद्याप निर्णय नाही


महायुतीत साताऱ्याच्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसचा दावा अजूनही कायम आहे. एकीकडे ही जागा भाजपकडे जाईल आणि उदयनराजे भोसले यांना उमेदवारी मिळेल अशी चर्चा आहे. मात्र दुसरीकडे राष्ट्रवादीचा दावा कायम आहे. तशी स्पष्ट भूमिका प्रफुल पटेल यांनी घेतल्याचं दिसतंय.


साताऱ्यात अजित पवारांनाही मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे साताऱ्याची जागा आम्हाला मिळावी अशी मागणी प्रफुल पटेलांनी केली आहे. तर दुसरीकडे आजच सातारच्या जागेवर भाजपकडून उदयनराजेंच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे. देवेंद्र फडणवीसांच्या पत्रकार परिषदेतच ही घोषणा केली जाईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. .


दोषी आढलो तर...


साताऱ्यातील  कोरेगाव मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांनी महविकास आघाडीचे सातारा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आमदार शशिकांत शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. नवी वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गाळे विक्री प्रकरणात 4 हजार कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.


या आरोपाला शशिकांत शिंदे यांनीही उत्तर दिले आहे. महविकास आघाडीकडून मला उमेदवारी मिळाल्यानंतर लोकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे, त्यामुळेच रडीचा डाव केला जातो आहे. मी सगळे पुरावे द्यायला तयार आहे. 


ही बातमी वाचा :