नागपूर :  सोलापूर आणि माढा परिसरातील (Madha Lok Sabha Constituency)  ज्येष्ठ धनगर नेते उत्तम जानकर (Uttam Jankar) यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची (Devendra Fadnavis) भेट घेतली. जानकर माढा आणि सोलापुरात महायुतीला पाठिंबा देणार का, याबद्दल ते आज संध्याकाळी निर्णय घेणार आहेत. जानकर यांनी मविआचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांना उमेदवारी देण्याचं ठरवलं होतं. मात्र त्यामुळे आपल्या उमेदवाराला फटका बसेल असं भाजपला वाटलं, आणि त्यानंतर फडणवीसांनी त्यांना तात्काळ नागपूरला बोलावून घेतलं. त्यांच्यासाठी बारामतीत विशेष विमानाची देखील सोय केली होती. दरम्यान, फडणवीसांची सकारात्मक चर्चा झाली, आज संध्याकाळी सात वाजता आपल्या कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यावर निर्णय जाहीर करू, असं जानकरांनी माध्यमांना सांगितलं.  ते नागपुरात बोलत होते.  


उत्तम जानकर हे धैर्यशिल मोहितेंना पाठींबा देण्याच्या तयारीत होते. मात्र तसं झालं तर महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना फटका बसू शकतो असं भाजपला वाटलं, आणि म्हणून उत्तम जानकरांना आपल्याकडे वळवण्याचे प्रयत्न भाजपनं सुरू केला. त्याचाच भाग म्हणून बारामतीला विशेष विमान पाठवण्यात आलं. एवढंच नाही तर जानकरांना दिल्लीत अमित शाहांची भेट घडवून देतो असं आश्वासन दिल्याचीही माहिती मिळतेय. जानकरांनी मात्र अजून ठोस निर्णय जाहीर केलेला नाही. फडणवीसांशी चर्चा झाल्यावर आपण कार्यकर्त्यांशी बोलून निर्णय जाहीर करू असं जानकर म्हणालेत. 


फडणवीसांशी चर्चा सकारात्मक : उत्तम जानकर


फडणवीसांच्या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना जानकर म्हणाले, माढा आणि सोलापूर लोकसभा मतदार संघाचा विषयी सविस्तर चर्चा झाली. आमच्या अडचणींवर सकारात्म चर्चा झाली. संध्याकाळी 7 वाजता कार्यकर्त्यांशी चर्चा करु. तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या ज्या अडचणी होत्या त्या फडणवीसांकडे मांडल्या आहेत.  बैठक सकारात्मक झाली. माढा आणि सोलापूर लोकसभe मतदारसंघाचा विषय होता. जवळपास एक तास बैठक झाली. त्यात आमच्या अडचणी, आमच्या मुद्दे याविषयी चर्चा झाली. चर्चा सकारात्मक झाली. काही प्रमुख नेते मंडळी बैठकीत निर्णय घेऊ. बैठकीत झालेल्या चर्चा कार्यकर्त्यांना सांगणार आहे. दहा वर्षातील अनेक अडचणी त्या देवेंद्र फडणवीसांसमोर मांडल्या आहेत. सोलापुरत बैठक होणार आहे. 


कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यावर निर्णय जाहीर करू : उत्तम जानकर


नाराजीतून भाजप सोडण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चांवर जानकर म्हणाले, त्यामुळेच आम्ही फडणीसांकडे आलो. फडणवीसांनी आमचे म्हणणे ऐकले आणि जे आश्वासन दिले ते कार्यकर्त्यांना सांगू त्यानंतर पुढील निर्णय जाहीर करण्यात येईल.  



हे ही वाचा :


Jayant Patil: फडणवीसांनी फिल्डिंग लावलेल्या नेत्याचा जयंत पाटलांना फोन, म्हणाला, विजयदादांना पक्षात घेतलंत चांगलं केलंत