Chitra Wagh vs Sanjay Raut : "महिलेच्या सन्मानाच्या गोष्टी करायच्या आणि दुसऱ्या ठिकाणी आमच्या नवनीत ताई बद्दल वेडवाकडं बोलायचं. ताईने त्याला तीन टप्पर शब्द वापरला होता. अरे तू आहेस कोण? काँग्रेसच्या फडावर तुणतुणे घेऊन नाच्याचं काम करणारा संजय राऊत तुझी लायकी काय आहे? हे आपण विचारलं पाहिजे. कोण आहे हा संजय राऊत? त्याने मुंबईच्या (Mumbai) पत्राचाळीत आर्थिक घोटाळा केला आहे", अशी जहरी टीका भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर केली. चित्रा वाघ (Chitra Wagh) भारतीय जनता पक्षाच्या प्रचारासाठी वर्धा (Wardha) दौऱ्यावर आहेत. यावेळी त्या बोलत होत्या. 


 खरा नालायक कोण हे विचारण्याची वेळ आलीये


चित्रा वाघ म्हणाल्या, उद्धव ठाकरेंच्या लायकीचा फुगा तर महाराष्ट्राने अडीच वर्षांपूर्वीच फोडलाय. पण छोट्या छोट्या आठवणी गोंडसच आहेत. ओवैसी होता आपल्या मातीमध्ये आला आणि औरंगजेबाच्या कबरीवर फुलं वाहण्यासाठी गेला होता. तेव्हा याच उद्धव ठाकरेंनी पळपुटेपण केला होता. त्यामुळे खरा नालायक कोण हे विचारण्याची वेळ त्याठिकाणी आली आहे, असा इशाराही वाघ (Chitra Wagh) यांनी दिला. 


मराठी माणसाला फसवण्याचे काम संजय राऊतने केलं


पुढे बोलताना वाघ म्हणाल्या, मराठी माणसाला फसवण्याचे काम संजय राऊतने (Sanjay Raut) केलं आहे. स्वर्गीय दिवंगत बाळासाहेब ठाकरेंचे नाव घेता. अरे बाळासाहेब असे होते की, शत्रू असलेल्या महिलेचाही सन्मान करणार होते. हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे. ज्यांनी महिलेला मान-सन्मान दिला. तुम्ही तर राजकारणापुरते शिवाजी महाराजांचे नाव वापरता. बाळासाहेबांचे नाव घेता आणि बाईच्या पदरावर राजकारण करण्याचं काम करता, असंही वाघ (Chitra Wagh) म्हणाल्या. 


संजय राऊत काय म्हणाले होते? 


ज्या बाईने मातोश्रीला आव्हान देण्याचा प्रयत्न केला, ज्या बाईने मातोश्रीमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. मातोश्रीविषयी अपशब्द वापरले. त्या बाईचा पराभव करणे, शिवसैनिकाचे कर्तव्य आहे. ती डान्सर, बबली, तुम्हाला खुनावेल, इशारे करेल, पण भुरळून जाऊ नका, अशी पातळी सोडून टीका संजय राऊतांनी (Sanjay Raut) केली होती. 


Uddhav Thackeray on PM Modi : भ्रष्टाचार केलेल्या माणसाला आपल्या पक्षात घेतात आणि मोदीची गॅरेंटी म्हणतात, शेतकऱ्यांचे अश्रू पुसायला कधी आले नाहीत, उद्धव ठाकरेंचा पीएम मोदींवर कडाडून हल्लाबोल