Uddhav Thackeray, बुलढाणा  : "निवडणूका जवळ येत आहेत. पर्वा पहिला टप्पा पार पडला. यापूर्वी शेतकऱ्यांवर संकट आलं, आपत्ती आली. तेव्हा कधीतरी तुमची चौकशी करायला नरेंद्र मोदी आले होते का? आता ते सगळीकडे फिरत आहेत. कारण त्यांना सर्वांना रामराम करायचाय. अमरावतीमध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या तेव्हा त्यांचे अश्रू पुसायला आलात का? त्या घटनाबाह्य गद्दाराला विचारतोय , कधी शेतकऱ्यांचे अश्रू पुसले का? तुम्ही जगा किंवा मरा, पण मला पंतप्रधान करा, अशी मोदींची अवस्था आहे. आज मी काय खायचं ते सांगा. 2047 सालचे कशाला सांगतात", अशी टीका ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर केली. महाविकास आघाडीचे बुलढाणा लोकसभेचे उमेदवार नरेंद्र खेडेकर ह्यांच्या प्रचारार्थ ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा पार पडली. यावेळी ते बोलत होते. यावेळी तेजस ठाकरेही उपस्थित होते.  


आईच्या कुशीवर वार करणारा हा गद्दार आहे


एका बाजूला गद्दार आहे. राजकीय जन्म शिवसेनेने दिला त्याच आईच्या कुशीवर वार करणारा हा गद्दार आहे, अशी टीका ठाकरेंनी प्रतापराव जाधव यांच्यावर केली. पुढे बोलताना ते म्हणाले, दुसरीकडे अन्यायावर वार करणारा नरेंद्र खेडेकर आहे. ज्या जिजाऊंनी शिवाजी महाराजांच्या रुपाने तेज दिलं. त्या मातेचा हा जिल्हा आहे. त्याच जिल्ह्यात भगव्याशी गद्दारी करणारी औलाद शिल्लक ठेवता येणार नाही, त्याला गाडावाच लागेल. शिवरायांच्या मावळ्याला तुम्ही नकली म्हणतात शिवसेनेला नकली म्हणतात ही काय डिग्री आहे तुमची नकली म्हणायला, असा सवालही ठाकरेंनी केला. 


सगळे देशभक्त पक्ष आज एकत्र आले आहेत


पुढे बोलताना ठाकरे म्हणाले, गेल्या महिन्यापेक्षा आज जरा उष्णता वाढली आहे. ही उष्णता केवळ सूर्य आणि जमिन तापलीये म्हणून तर महाराष्ट्रातील जनता पेटलेले आहे. म्हणून उष्णता वाढलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या भगव्याला डाग लावण्याचा काम तुम्ही गद्दाराच्या मदतीने केला. मागच्या वेळीही मी आलो होतो. मात्र, यावेळेसच्या सभेकडे सर्वांचे लक्ष होते की, किती लोकांची गर्दी असेल. गेल्यावेळी पेक्षा जास्त गर्दी यावेळी दिसत आहे, याचा अभिमान आहे. सगळे देशभक्त पक्ष आज एकत्र आले आहेत,असंही ठाकरेंनी सांगितलं. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Ranjeetsinha Naik-Nimbalkar on Madha Loksabha : मोहिते पाटलांनी भाजपला टोपी घातली, आता पीएम मोदी माळशीरसमध्ये सभा घेतील, रणजित निंबाळकरांची माहिती