मुंबई : राज ठाकरेंनी (Raj Thackeray) महायुतीला पाठिंबा देण्यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाचे खासदार संजय राऊतांनी (Sanjay Raut) खोचक टीका केलीये. भाजपनं राज यांना अशी कुठली फाईल दाखवली की त्यांना तात्काळ पाठिंबा जाहीर करावा लागला, असं राऊत म्हणाले. अमित शाहांना (Amit Shah)  या राज्यात पाय ठेवू देऊ नका असं म्हणणारे राज ठाकरे महायुतीला पाठिंबा देतात, त्यामागचं कारण त्यांनी जनतेला सांगावं असा आव्हान देखील राऊतांनी राज ठाकरेंना दिलं.  ते मुंबई माध्यमांशी बोलत होते.


संजय राऊत म्हणाले,  शरणागती यासाठी पत्करली की त्यांच्या अनेक फाईली उघडल्या गेल्या धमक्या दिल्या म्हणून मला असं वाटतं.  व्याभीचार हा भाजपचा जगजाहीर आहे. अशा व्याभीचारी पार्टी बरोबर कोणी संबंध ठेवत असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे. आपली स्वतःची चोरी आपण कशी काय होऊ देऊ शकतो. ठाकरे हे असं नाव आहे त्यांना कोणी झुकवू शकत नाही . उद्धव ठाकरेंना झुकविण्याचा प्रयत्न झाला ते झुकले नाहीत. आम्ही सगळे बाळासाहेबांचे शिलेदार आहोत.आम्हाला तोडण्याचा प्रयत्न झाला आणि तुटलो नाही .त्यांच्याशी लढतो आहोत महाराष्ट्राला लढणाऱ्यांची गरज आहे.


तुमच्या पक्षाचा नमो निर्माण पक्ष का झाला? संजय राऊतांचा सवाल 


महाराष्ट्राची गेल्या काही दिवसापासून जी लूट सुरू आहे. जे खोक्याचे घाणेरडे राजकारण सुरू आहे .त्याचे सूत्रधार नरेंद्र मोदी आणि अमित शहा आहेत. महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी निर्माण झालेला पक्ष महाराष्ट्राच्या शत्रूंना  पाठिंबा देतोय त्यामुळे लोकांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला असेल. तुमच्या पक्षाचा नमो निर्माण पक्ष का झाला? हे त्यांनी सांगावं, असा सवाल संजय राऊत यांनी केला. 


आम्ही स्वार्थासाठी कधीही भाजप सोबत राहिलो नाही, राऊतांचा पलटवार 


राज ठाकरेंच्या  उद्धव ठाकरेंवरील जाहीर टीकेनंतर संजय राऊत म्हणाले.  आम्ही महाराष्ट्राच्या अस्मिता आणि स्वाभिमानासाठी लढत आहोत .आम्ही मोदी आणि शहा यांच्याशी लढत आहोत. आम्ही स्वार्थासाठी कधीही भाजप सोबत राहिलो नाही .  भाजपने जेव्हा खरे दात दाखवायला सुरुवात केली तेव्हा आम्ही तो जबडा फाडून बाहेर आलो आणि आम्ही स्वतंत्र राहिलो. आजही आमची भूमिका महाराष्ट्र संदर्भात स्पष्ट आहे जर कोणी महाराष्ट्रावर घाव घालत असेल स्वाभिमानाला ठेच पोहोचत असेल तर आम्ही एकत्र येऊन त्यांना ठेचणार.  अजित पवार ,हसन मुश्रीफ अशी अनेक नावं आहेत ज्यांनी बिनशर्थ भाजपसोबत जायचं मान्य केलं ते का गेले कोणाच्या दबावामुळे गेले हे सर्वांना माहीत आहे.


विशाल पाटील 2019 ची चूक पुन्हा करणार नाही : संजय राऊत 


सांगलीच्या विशाल पाटील यांच्या  नाराजीवर बोलताना संजय राऊत म्हणाले, विशाल पाटील हे वसंतदादा पाटील यांच्या कुटुंबातील आहेत. वसंतदादा पाटील हे काँग्रेसचे महाराष्ट्रातील पितामह आहेत . विशाल पाटील यांनी 2019 घेऊन उभे होते परंतु ते पडले आता ते परत अशी चूक करतील असे वाटत नाही . सर्व ठीक होईल आमच्यासाठी अवघड काही नाही. 


हे ही वाचा :


Raj Thackeray Gudi Melava 2024  Highlights राज ठाकरेंचा मोदींना बिनशर्त पाठिंबा ते उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांवर जहरी टीका; वाचा मेळाव्यातील दहा ठळक मुद्दे