Sanjay Raut on Jaykumar Gore : राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांनी एका महिलेला स्वतःचे नग्न फोटो पाठवत विनयभंग केल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला. यानंतर जयकुमार गोरे यांच्याविरोधात विधान करणाऱ्यांविरोधात हक्कभंग दाखल करण्यात आलाय. संजय राऊत, आमदार रोहित पवार (Rohit Pawar) आणि लय भारी youtube चॅनेल यांच्या विरोधात हक्क भंग दाखल करण्यात आला आहे. यावरून संजय राऊत यांनी जयकुमार गोरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय.


संजय राऊत म्हणाले की, जयकुमार गोरे यांनी हक्कभंग आणावा. कोणावरती ते हक्कभंग आणणार आहेत? त्या महिलेवर? ज्या महिलेचा त्यांनी छळ केला, विनयभंग केला, तिला छायाचित्र पाठवून अपमानित केले असेल किंवा एक प्रकारे स्वारगेट प्रकरण वेगळ्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न केला असेल, कोर्टात निर्दोष वगैरे सुटला ते तुम्ही कोणाला सांगतात? आमच्याकडेही ऑर्डर आहे, असे प्रत्युत्तर त्यांनी जयकुमार गोरे यांना दिले. 


आधी स्वतः कडे खाली वाकून बघा


संजय राऊत पुढे म्हणाले की, तुम्ही तुरुंगात पण गेलात तरी, देवेंद्र फडणवीस यांनी तुम्हाला कसं काय मंत्रिमंडळात घेतलं? इतके करून सुद्धा आता मंत्री झाल्यानंतर आपण पुन्हा त्या महिलेला त्रास देत आहात. त्या महिलेची नवी तक्रार राज्यपालांकडे आहे. 17 मार्चपासून ती अबला महिला विधान भवनासमोर उपोषणाला बसणार आहे. मग तुम्ही हक्कभंग कोणाविरुद्ध आणताय बघतोच मी. हे छोटे किरीट सोमय्या आहेत. ते ज्युनिअर किरीट सोमय्या आहेत. स्वतःचे नागडे फोटो पाठवायचे, व्हिडिओ करायचे अशा छोट्या किरीट सोमय्याला आपण मंत्रिमंडळात घेऊन देवेंद्रजी महाराष्ट्राची कुठली संस्कृती देशाला दाखवत आहात? तुम्ही आमच्यावर हल्ले करतात, विरोधकांवर हल्ले करतात. आधी स्वतः कडे खाली वाकून बघा, असा हल्लाबोल देखील त्यांनी केला.  


मुख्यमंत्र्यांनी जयकुमार गोरेंचा राजीनामा घेतला पाहिजे


जयकुमार गोरे यांचा तत्काळ राजीनामा द्यायला हवा. त्या महिलेशी माझं बोलणं झालं आहे. ती म्हणते मला जर अशा छळातून मुक्त केले नाही तर मी आत्महत्या करेन. मी एक सुसंस्कृत स्त्री आहे. हा माणूस माझ्या मागे हात धुवून लागला आहे. मला रात्री हा माणूस त्रास देतो. माझे जगणे मुश्किल झाले आहे. मला आत्महत्या करावी लागेल. त्यामुळे संसदेचे सदस्य म्हणून समाज जीवनात काम करणाऱ्या आमच्यासारख्या लोकांनी गप्प बसायचे का? मुख्यमंत्र्यांनी जयकुमार गोरे यांचा राजीनामा घेतला पाहिजे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. 



आणखी वाचा 


Sanjay Raut on Bhaiyyaji Joshi : हे तर औरंगजेबापेक्षा भयंकर कृत्य; घाटकोपरची भाषा गुजराती म्हणणाऱ्या आरएसएसच्या भय्याजी जोशींवर संजय राऊतांचा घणाघाती प्रहार