Vidhanparishad Election: विधानसभा निवडणुकानंतर रिक्त झालेल्या विधान परिषदेच्या 5 जागांसाठी निवडणूक जाहीर झाली असून सध्या शिवसेनेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये या जागांसाठी जोरदार लॉबिंग सुरू आहे .येत्या 27 मार्चला या पाच जागांसाठी निवडणूक होणार आहे .यात भाजपच्या 3 आणि शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या खात्यात प्रत्येकी 1 / 1 जागांवर कोणाची वर्णी लागणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे .(VidhanParishad Election)
विधान परिषदेच्या पाच रिक्त जागांसाठी 27 मार्च रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असून त्यासाठीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केलाय .यात महायुती मधील भाजपचे तीन राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गटाच्या प्रत्येकी एक जागा रिक्त आहेत .या जागांसाठी ही निवडणूक होणार असून शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून या जागांसाठी जोरदार लॉबिंग सुरू आहे .
कोणाची नावे चर्चेत ?
विधानसभा निवडणुकीनंतर आमच्या पाडवी प्रवीण दटके राजेश विटेकर रमेश कराड आणि गोपीचंद पडळकर हे विधान परिषदेतील आमदार विधानसभेवर निवडून आल्याने विधान परिषदेच्या पाच जागा रिक्त झाल्या आहेत .आता या जागांवर शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून जोरदार प्रयत्न होताना दिसतात .शिवसेनेत रवींद्र फाटक शितल म्हात्रे आणि चंद्रकांत रघुवंशी यांचे नाव चर्चेत आहे .तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे झिशान सिद्दकी,संग्राम कोते पाटील आणि आनंद परांजपे यांची नावे चर्चेत आहेत. 5 पैकी 3 जागा भाजपच्या कोट्यात असून
भाजपकडून खालील नावे चर्चेत
राम सातपुतेजगदीश मुळीकसंदीप जोशीसंजय केणीकरप्रमोद जठारकेशव उपाध्ये
निवडणूक कार्यक्रम कसा असणार ?
विधान परिषदेच्या रिक्त पाच जागांसाठी निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून 17 मार्च ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे .18 मार्चला उमेदवारी अर्ज यांची छाननी होणार असून उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख 20 मार्च आहे .27 मार्चला सकाळी नऊ ते संध्याकाळी चार या वेळेत मतदान प्रक्रिया होणार आहे. मतदान पूर्ण झाल्यानंतर संध्याकाळी पाच वाजता मतमोजणीला सुरुवात होऊन निकाल जाहीर करण्यात येणार आहे .
निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता
विधान परिषदेच्या 5 रिक्त जागांमुळे आता शिंदे गट आणि अजित पवार गटाच्या नेत्यांनाआमदार होण्याची संधी मिळणार असून यात तीन भाजप आणि एकेक आमदार शिंदे आणि अजित पवार गटाचा असेल .दरम्यान निवडून येण्यासाठी 57 मतांचा कोटा लागणार असून विरोधी पक्षांच्या तीनही पक्षांची एकत्रित बेरीज केली तरी 57 मते होण्याची शक्यता नसल्याने ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे .ज्या पक्षाचा जो आमदार विधान परिषदेतून विधानसभेत गेला ती जागा त्या पक्षाला दिली जाण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येत आहे.
हेही वाचा: