Sanjay Raut on Vidhan Parishad Election : विधानपरिषदेच्या 11 जागांच्या निवडणुकीसाठी (Vidhan Parishad Election) आज (दि.12) मतदान पार पडले. 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात असल्यामुळे सर्वच पक्षांनी मतांची फाटफूट होऊ नये, म्हणून कंबर कसली होती. शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार शहाजी पाटील आजारी असतानाही मतदानासाठी आले होते, तर दुसरीकडे जेलमध्ये असलेले भाजप आमदार गणपत गायकवाड यांनीही मतदानाचा हक्क बजावलाय. त्यामुळे निवडणुकीत काटे की टक्कर होताना दिसत आहे. दरम्यान, या निवडणुकीबाबत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाष्य केलं आहे. 


संजय राऊत काय काय म्हणाले?


संजय राऊत म्हणाले,  क्रिकेटची टीम 11 जणांची असते, मात्र बारावा खेळाडू कधी कधी खेळतो. तु्म्ही ज्याला बारावा खेळाडू समजत आहात, तो खेळणार आहे. महायुतीची भरोशाची विकेट जाणार आहे. आपण वर्ल्डकप जिंकललो आहोत. महाविकास आघाडीचे तिन्ही उमेदवार (Vidhan Parishad Election) जिंकतील. सुप्रीम कोर्टाने अरविंद केजरीवाल यांना जामिन मंजूर केला, त्यांच्या निर्णयाचे मी स्वागत करतो. अरविंद केजरीवाल यांना खालच्या कोर्टाने जामीन मंजूर केला होता. त्याला स्थगिती देण्याचं काहीही कारण नव्हतं. मोदी-शाहांचा राजकीय दबाव ईडीवर आणि न्यायालयावर असल्यामुळे स्थगिती मिळाली, पण आता त्यांनी चूक दुरुस्त केलेली आहे. 


अनिल देशमुख, नवाब मलिक तुरुंगात होते त्यांना मतदानासाठी तुरुंगातून कोणी येऊ दिलं नाही


भाजपचे आमदार गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad) जेलमधून येऊ शकतात. पण अनिल देशमुख (Anil Deshmukh), नवाब मलिक तुरुंगात होते त्यांना मतदानासाठी तुरुंगातून कोणी येऊ दिलं नाही, पण गणपत गायकवाड येऊ शकतात. यालाच सत्तेचा गैरवापर म्हणतात. नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत. त्यांना कोठे जाण्यापासून कोणीही थांबवलेलं नाही. त्यांनी मुंबईत यावं मुंबईच्या विकासाचा विचार करावा, विकासावर बोलावं. त्यांनी गोरेगाव मुलुंड लिंक रोडचं भूमिपूजन करावं. पण त्याआधी त्याचं एकदा भूमिपूजन झालेलं आहे, असेही संजय राऊत यांनी सांगितले. विधानपरिषद निवडणुकीबाबत बोलताना संजय राऊतांना पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही सडकून टीका केली. 





इतर महत्त्वाच्या बातम्या 


IAS Officer Pooja Khedkar's Family : खेडकर कुटुंबियांची मग्रुरी, जमीन हडपण्यासाठी शेतकऱ्यांचा चारा पेटवून दिला, शेळ्यांवर कुत्री सोडली; पोलिसही दखल घेईनात