मुंबई : शिंदेंच्या शिवसेनेतील (Shiv Sena) अनेकांचे परतीसाठी फोन आल्याचा दावा संजय राऊतांनी केला आहे. आम्हाला पुन्हा पदरात घ्या, म्हणत शिंदे गटातील (Shinde Group) अनेकांचे फोन आले, असा दावा (Thackeray Group) संजय राऊत (Sanjay Raut) यांनी एबीपी माझाच्या तोंडी परीक्षा या विशेष कार्यक्रमात केला आहे. गद्दारांना आता पुन्हा शिवसेनेत स्थान नाही, असं उद्धव ठाकरेंनी सांगितल्याचं संजय राऊतांनी म्हटलं आहे.


आम्हाला पुन्हा पदरात घ्या


शिंदे गटात गेलेल्यांचे आम्हाला पुन्हा पदरात घ्या, यासाठी फोन आले आहेत. आमची चूक झाली, आम्हाला पुन्हा  घ्या, आम्हाला पुन्हा मशालीच्या प्रकाशात घ्या, असं म्हणत अनेकांना गेल्या काही दिवसात फोन केले, असा गौप्यस्फोट संजय राऊतांनी केला आहे. पण, आता गेले ते गेले, ज्याला गद्दारीचा शिक्का लागलो तो कधीच मोठा नसतो, असंही राऊतांनी म्हटलं आहे. 


तिकडे लाथा बसल्या म्हणून आई आठवली


तुम्हाला तिकडे लाथा बसल्या म्हणून तुम्हाला तुमची आई आठवली, हे कसं चालेल. तुमच्या गैरहजेरीत ज्यांनी हा पक्ष टिकवला, वाढवला, स्वाभिमानाने लढले, ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले, जे तुरुंगात गेले, त्यांना आम्ही काय उत्तर देणार, असं म्हणत संजय राऊतांनी गद्दारांना पुन्हा शिवसेनेत स्थान नसल्याचं स्पष्ट केलं आहे.


मातोश्रीचे दरवाजे कायमचे बंद


शिंदेच्या सोबत गेलेल्यांसाठी शिवसेना आणि मातोश्रीचे दरवाजे कायमचे बंद आहेत. आमच्या मनातील दरवाजे कधीच बंद झाले आहेत. आमच्या मनाच्या भावना मातोश्री जाणतं. गद्दारांना आता पुन्हा शिवसेनेत स्थान नाही, असं उद्धव ठाकरेंनी सांगितल्याचं संजय राऊतांनी म्हटलं आहे.


राऊत पुढे म्हणाले की भाजपने नाकारलेल्या खासदाराला प्रवेश दिला. पण त्यांना आम्ही उमेदवारी दिली नाही. ज्यांनी शिवसेनेच्या तिकीटावर निवडून येत गद्दारी केली, त्यांना पुन्हा स्थान नाही. यामध्ये आता फायदा तोटा नाही, असंही राऊत म्हणाले आहेत.


पाहा व्हिडीओ : गद्दारांना आमच्या पक्षात अजिबात स्थान नाही : संजय राऊत



महत्त्वाच्या इतर बातम्या :


Sanjay Raut : यंदाच्या निवडणुकीत गद्दारांवर लक्ष, मातोश्रीचे दरवाजे कायमचे बंद : संजय राऊत