Sanjay Raut on BJP, Mumbai Meeting : "कार्यवाहक पंतप्रधान किंवा चार जूननंतर भूतपूर्व होणाऱ्या पंतप्रधानांची आज मुंबईत सभा आहे. मागील काही दिवसापासून त्यांचा मुक्काम महाराष्ट्रमध्येच आहे. रस्त्यावर आणि गल्लोगल्ली फिरतायत, मोदीजी लक्षात घ्या आम्ही तुम्हाला आताच रस्त्यावर आणलं आहे.  तुमचा आवडता झोला घेऊन आता हिमालयात जावं लागेल.  त्याची व्यवस्था महाराष्ट्रचं करणार आहे. महाराष्ट्राशी पंगा घेतलाय आता सोडणार नाही. मोठा भाई, छोटा भाई, गांडा भाई कुठलाच भाई आता चार जून नंतर राहणार नाही " असे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले. मुंबईतील बीकेसी मैदानावर इंडिया आघाडीची सभा पार पडली. यावेळी संजय राऊत बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेही उपस्थित होते.


ज्यांनी नकली शिवसेना म्हटलं त्यांना बाळासाहेब शाप देतील 


संजय राऊत म्हणाले, केजरीवाल आणि संजय सिंग, संजय राऊत तुरुंगातून सुटून आलेत.  आता भाजपासाठी तीच ईडी असणार आहे. भाजप हा चोर बाजार आहे, भिंडी बाजारच्या पुढे एक चोर बाजार आहे.  देशात चोरलेला माल चकचकित करन मिळतो.  मोदी शिवतीर्थवरून जाऊन बाळासाहेब यांच्या स्मृतीला अभिवादन करणार असं ऐकलं.  हे करू नका बाळासाहेबांना यातना होतील. ज्यांनी नकली शिवसेना म्हटलं त्यांना बाळासाहेब शाप देतील. पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले,  मोदींनी देशासाठी काय केलं? एक मंत्र दिला काम धंदा मंदम, जिंदगी झंडम, फिरभी घमंडम.  तुमचा हा घमेंड चार जूननंतर चालणार नाही.  एकनाथ शिंदेंची नकली सेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी हे महाराष्ट्रमध्ये तयार झालेले पाप आहे. काल पर्यंत ज्यांना चक्की पिसिंग म्हणत होता.ा आज त्यांचं किसिंग मोदी घेतायत.


व्याभिचर करा, बलात्कार करा आणि सत्ता मिळवा हे राज्य स्वीकारणार नाही


व्याभिचर करा, बलात्कार करा आणि सत्ता मिळवा हे राज्य स्वीकारणार नाही.  उत्तम चाललेलं सरकार यांनी पाडले कारण काय तर म्हणे विकास करायचा.  नागपूरचा थकला म्हणून ठाण्याचा आणला तो ही चालला म्हणून बारामतीच आणला. नांदेडचा हात ही धरला तरी कमलबाईच्या पोटी विकास जन्मला नाही. मोदी तुमच्या वयाची पंच्चाहत्तरी पार होत आहे. आता तुमची वृद्ध आश्रमात जायची वेळ झाली आहे. महाराष्ट्रामध्ये आम्ही उत्तम वृद्धाश्रम केलेत. आम्ही सरकार कसे चालवतो तिथून पाहा, असंही संजय राऊत म्हणाले.  


इतर महत्वाच्या बातम्या 


Arvind Kejriwal : शिवसेना चोरली, राष्ट्रवादीचे दोन तुकडे केले, मोदीजी भित्रे आहेत, हिंमत असेल तर समोरासमोर लढा, अरविंद केजरीवालांचा पीएम मोदींवर हल्लाबोल