Solapur , FIR against Devendra Kothe : मुस्लीम समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी भाजप नेत्याविरोधात शिंदे गटाकडून तक्रार करण्यात आली आहे. याप्रकरणी भाजप नेते देवेंद्र कोठे (Devendra Kothe) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवसेना शिंदे गटाच्या अल्पसंख्यांक विभागाच्या जिल्हाप्रमुखाने केलेल्या तक्रारीवरून जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय.
योगी आदित्यनाथ यांच्या सभेत केले होते आक्षेपार्ह वक्तव्य
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सोलापुरातील जाहीर सभेत देवेंद्र कोठे यांनी भाषण केले होते. यावेळी त्यांनी मुस्लीम समाजाबद्दल आक्षेपार्ह भाषण केले होते. दरम्यान, याप्रकरणी सोलापुरातील जेलरोड पोलीस ठाण्यात कलम 295 (A) नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय. मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
राम सातपुतेंच्या प्रचारार्थ योगींची सभा
सोलापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रसने प्रणिती शिंदे यांना मैदानात उतरवल्यानंतर भाजपने राम सातपुतेंना उमेदवारी दिली. त्यानंतर राम सातपुतेंच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचीही सभा पार पडली होती. दरम्यान योगी आदित्यनाथ यांच्या सभेवेळी देवेंद्र कोठे यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुखांनी केला आहे.
एप्रिलमध्ये केला होता भाजपप्रवेश
देवेंद्र कोठे यांनी एप्रिलमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला होता. देवेंद्र कोठे हे सुशीलकुमार शिंदे यांच्या कॅम्पेनसाठी काम करत होते. त्यामुळे प्रणिती शिदेंना ऐन लोकसभा निवडणुकीत मोठा धक्का बसला होता. देवेंद्र फडणवीसांनी खेळी करत देवेंद्र कोठे यांना गळाला लावले होते.
इतर महत्वाच्या बातम्या
Prithviraj Chavan on Devendra Fadnavis : सिंचन घोटाळ्यात फडवणवीसांना जावईशोध कधी लागला आणि तो शोध पंतप्रधानांना का सांगितला नाही? : पृथ्वीराज चव्हाण