Arvind Kejriwal, Bhiwandi Meeting :"विरोधी पक्षांच्या नेत्यांना अटक केले. काँग्रेस पार्टीचे बँक अकाऊंट फ्रिज केले. शिवसेना चोरली, राष्ट्रवादीचे दोन  तुकडे केले, असं करुन निवडणूक लढणार आहात?  मोदीजी तुम्ही भित्रे आहात", असं म्हणत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला. भिवंडीत इंडिया आघाडीची सभा पार पडली. यावेळी अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारही उपस्थित होते. इंडिया आघाडीची मुंबईतील बीकेसीच्या मैदानावर सभा पार पडणार आहे. तत्पूर्वी केजरीवालांनी भिवंडीतील सभेलाही हजेरी लावली आहे. 


अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) म्हणाले, मी दिल्लीतील लोकांना मोफत उपचार करुन दिले. मात्र, मला शुगर आहे, जेलमध्ये मला 15 दिवस गोळ्या घेऊ दिल्या नाहीत. मला रोज चार वेळेस इंजक्शन लागते. मी तुरुंगात असताना मला इंजक्शन देखील घेऊ देत नव्हते. मला जेलमध्ये टाकून दिल्लीतील लोकांना मोफत मिळणारी वीज बंद करु इच्छित आहेत. पुतीनने विरोधी पक्षांच्या नेत्यांना जेलमध्ये टाकले किंवा मारुन टाकले. पाकिस्तान आणि बांगलादेशमध्येही तशीच अवस्था आहे. मोदीजी भारतातही तसंच करु इच्छित आहेत. 


मी तुमच्यासमोर देशाला वाचवण्याची भीक मागतोय 


अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) म्हणाले, मी दिल्लीवरुन आलोय. मी तुमच्यासमोर देशाला वाचवण्याची भीक मागतोय. काही दिवसांपूर्वी माझी तुरुंगातून सुटका झाली. मी सुप्रीम कोर्टाचे आभार मानतो, त्यांनी माझी सुटका केली. मला वाटत नव्हते, की माझी एवढ्या लवकर सुटका होईल. मी ठरवलंय, 21 दिवस झोपणार नाही. 24 तास संपूर्ण देशात फिरुन लोकांना जागृत करण्याचा प्रयत्न करणार आहे. 


मी गरिबांच्या शिक्षणाची व्यवस्था केली, त्यामुळे मला तुरुंगात टाकण्यात आले


पुढे बोलताना अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) म्हणाले, मला जेलमध्ये का टाकले? मी छोटा माणूस आहे. आमची दोन राज्यात सत्ता आहे. हे तर ताकदवार माणसं आहेत. मला जेलमध्ये टाकले कारण मी दिल्लीत चांगल्या शाळा बांधल्या. मी गरिबांच्या शिक्षणाची व्यवस्था केली, त्यामुळे मला तुरुंगात टाकण्यात आले. मी सरकारी शाळांना शानदार बनवले. त्यामुळे मला तुरुंगात टाकले. तुम्ही देशात 50 हजार शाळा बनवा, तर मोदीजी तुमचे मोठेपण असेल, असं म्हणत अरविंद केजरीवालांनी पीएम मोदींवर जोरदार हल्लाबोल केला. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Prithviraj Chavan on Devendra Fadnavis : सिंचन घोटाळ्यात फडवणवीसांना जावईशोध कधी लागला आणि तो शोध पंतप्रधानांना का सांगितला नाही? : पृथ्वीराज चव्हाण