मुंबई : लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) आमचं गद्दारांवर हेच लक्ष असेल, गद्दारांना पुन्हा थारा नाही, मातोश्रीचे दरवाजे कायमचे बंद, असं म्हणत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी जोरदार निशाणा साधला आहे. एबीपी माझाच्या 'तोंडी परीक्षा' (ABP Majha Tondi Pariksha ) या कार्यक्रमात संजय राऊत यांनी हजेरी लावली होती. 


आगामी लोकसभा निवणडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचा 400 पारचा नारा आहे. शिवसेनेतील बंडखोरी, राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट यामुळे यंदाची निवडणूक फारच रंजक होणार असल्याने त्याकडे सर्वांच लक्ष आहे. 


महाराष्ट्र देशाच्या राजकारणाचा गेम चेंजर


बदल करायचं लोकांनी ठरवलं आहे. महाराष्ट्र राज्य देशाच्या राजकारणाचा गेम चेंजर असेल, असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. यावेळी राऊत पुढे म्हणाले की, भाजपला देशात 235 जागा मिळतील. आम्ही भाजपसारखं 48 जागाचं काही म्हणणार नाही, महाविकास आघाडीला 35 पेक्षा अधिक जागा मिळतील, असंही राऊत म्हणाले.


शिंदे आणि अजित पवार घाबरून भाजपसोबत


शिवसेना, राष्ट्रवादी का फुटली? शिंदे आणि अजित पवार हे घाबरून भाजपसोबत गेले. त्यांच्या जाण्याची कारणे ही त्यांच्या डरपोकपणात आहेत. हे ईडी, सीबीआय, आयकर विभागाला घाबरून गेले आहेत, हे जग जाहिर आहे. भाजपने त्यांना वॉशिग मशीनमधून स्वच्छ केलं म्हणून त्यांची पाप धुवून निघणार नाहीत. एकनाथ शिंदे, अजित पवार आणि त्यांच्यासोबतचे लोक गेले ते का गेले, हे सर्वांना माहित आहे, असंही राऊतांनी म्हटलं आहे.


महाविकास आघाडी म्हणून काम करतो


महाराष्ट्र अखंड राहावा, हाच शिवसेनेचा विचार आहे. जात-पात, धर्म न पाळणारी महत्त्वाची संघटना काम करत आहे. फुले, आंबेडकर, शाहू यांच्या भूमिकेतून आम्ही काम करतोय, त्यांच्यासह प्रबोधन ठाकरे यांचे विचार आहेत. महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा, मराठी माणसाच्या कल्याणाचा शिवसेनेचा विचार आहे. शिवसेनेचे विचार वेगळे आहेत, पण आम्ही महाविकास आघाडी म्हणून काम करतो. लोकसभा मतदारसंघात ज्या पक्षाचा उमेदवार आहे, त्या पक्षाला तो मतदारसंघ देण्यात आला, असंही राऊतांनी यावेळी म्हटलं आहे.



महत्त्वाच्या इतर बातम्या :


संजय राऊत म्हणतात इंडिया आघाडीत मंत्रिपद नको, पण हे दोन विभाग द्या, कसे काम करतात दाखवतो!