बुलढाणा : मोदी नाही, औरंगजेब म्हणा. राज्यावर चाल करुन आले, त्याचं काय होतं हे औरंगजेबाला विचारा, असं म्हणत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (PM Narendra Modi) निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत बुलढाणा दौऱ्यावर होते. बुलढाण्यातील मेहकर येथील सभेत संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदी आणि भाजपवर निशाणा साधला. याशिवाय उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनीही मोदी सरकारवर तौफ डागली आहे. 


राऊतांकडून मोदींची औरंगजेबाशी तुलना


संजय राऊत यांनी सभेला संबोधित करताना म्हटलं की, महाराष्ट्रात छत्रपती शिवराय जन्माला आले आणि औरंगजेबाचा जन्म गुजरातमध्ये झाला. गुजरातमध्ये जिथे मोदी जन्माला आहे, त्याच्या बाजूला दाहोद नावाच्या गावात औरंगजेब जन्माला आला. म्हणून ही औरंगजेबी वृत्ती गुजरात आणि दिल्लीवरून महाराष्ट्रावर चाल करुन येत आहे आणि शिवसेनेच्या विरोधात येते. यावर सभेला जमलेल्या कार्यकर्त्यांनी मोदी आले, असं म्हटल्यावर राऊत म्हणाले, 'मोदी नाही, औरंगजेब आला म्हणा.'


मोदी नव्हे, औरंगजेब म्हणा


संजय राऊत म्हणाले की, या मातीत गद्दार गाडले जातील. या मातीत हे गद्दार आलेत, हे गद्दार तुम्ही गाडणार का, असाल विचारताच जनतेतून 'मोदी आले' असा आवाज आला. यावर संजय राऊत म्हणाले, मोदी नाही औरंगजेब आला म्हणा. या राज्यावर चाल करून आले की, त्यांचे काय हाल होतात हे औरंगजेबाला विचारा. यांना हे राज्य विकायचं आहे. हे आपल्याला होऊ द्यायचं नाही , जोपर्यंत शिवसेना आहे, तोपर्यंत हे होऊ देणार नाही. असंही संजय राऊत म्हणाले आहेत.


उद्धव ठाकरेंनी तोफ डागली


उद्धव ठाकरे यांनीही सभेत मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.  उद्धव ठाकरे म्हणाले की, ज्या प्रमाणे हेईडी भाई, आयटी भाई आहेत त्यांच्या भरवशावर हे मजा मरतात आणि त्याच्या भीतीने हे शेपूट घालून भाजपात गेले. यांची चाकरी करणे म्हणजे आयुष्य नव्हे. ज्या मातीत जिजाऊ जन्माला आले, त्याच मातीत खंदुजी जन्माला आले, या देवेंद्र फडणवीसांना लाज वाटायला पाहिजे, मी पुन्हा येईन म्हणतो आणि तेही दोन पक्ष फोडून. मोदी उद्दव ठाकरेला संपवण्यासाठी कचरा जमा करायला लागतो. खताच्या पिशवीवर मोदींचा फोटो आणि आतमध्ये शेणखत. हा फोटो आता आपल्याला बदलवून टाकायचा आहे. हे आता भाजपवाले कचरा जमा करायला लागलेत. मोदी खत टाकलं तर गद्दारीचे अंकुर फुटतील. या तुमच्या गद्दार खासदाराला किती दिवस खासदार करणार, असं म्हणत ठाकरेंनी मोदी सरकारवर तोफ डागली आहे.


पाहा व्हिडीओ : राज्यावर चाल करून आलेल्यांचं काय होतं औरंगजेबाला विचारा : संजय राऊत



महत्त्वाच्या इतर बातम्या : 


मोठी बातमी : खैरे-दानवे वादावर उद्धव ठाकरेंची बंद दाराआड चर्चा, नेमकं काय ठरलं?