एक्स्प्लोर

Sangli Politics : विटामध्ये राजकीय जुगलबंदी, संजयकाकांचा अमित देशमुखांना भाजपत येण्याचा आग्रह, देशमुख म्हणाले मला बोलवणाऱ्यांनीच स्वगृही यावं!

Sangli Politics : सांगली जिल्ह्यातील विटामध्ये चांगलीच राजकीय जुगलबंदी रंगली. खासदार संजयकाका पाटील यांनी अमित देशमुख यांना भाजपमध्ये येण्याचा आग्रह केला तर संजयकाकांनीच स्वगृही यावं असं म्हणत देशमुख यांनी टोला लगावला. 

Sangli Politics : सांगली (Sangli) जिल्ह्यातील विटामध्ये काँग्रेसचे नेते अमित देशमुख (Amit Deshmukh) आणि भाजपचे खासदार संजयकाका पाटील (Sanjaykaka Patil) यांच्यात चांगलीच राजकीय जुगलबंदी रंगली. खासदार संजयकाका पाटील यांनी अमित देशमुख यांना भाजपमध्ये येण्याचा आग्रह केला तर संजयकाकांनीच स्वगृही यावं असं म्हणत देशमुख यांनी टोला लगावला. 

विटा इथे गुरुवारी (13 जानेवारी) नेचर केअर फर्टिलायझर्सचे संस्थापक जयंत वामन तथा बाबा बर्वे (Baba Barve) यांच्या कृषी क्षेत्रातील अनमोल कामगिरीबद्दल कृतज्ञता सोहळा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात काँग्रेसचे नेते, माजी मंत्री अमित देशमुख आणि भाजपचे खासदार संजयकाका पाटील एकत्र आले होते. यावेळी सुरुवातीला भाजपचे संजयकाका पाटील यांनी अमित देशमुखांना भाजपात येण्याचा आग्रह केला. यावर पलटवार करताना अमित देशमुखांनी लातूरचा देशमुख वाडा कितीही वादळे आली आणि कितीही संकटे आली तरी आहे  तिथेच राहणार आहे, मला बोलवणाऱ्यांनी स्वतः स्वगृही (काँग्रेसमध्ये) यावं, असा टोला भाजपच्या नेत्यांना लगावला.

तुम्हाला भाजपमध्ये येण्याचा आग्रह न करणं यथोचित होणार नाही : संजयकाका पाटील

काल तुमची न्यूज टीव्हीवर ऐकली. संभाजी पाटलांनी काही वक्तव्ये केली की लातूरचे नेते भाजपमध्ये येण्याची शक्यता आहे. आजचा कार्यक्रम हा जयदेव बर्वे यांनी घेतलेला आहे. ज्यांच्या वाड्यामध्ये साठ वर्षांपासून संघाची शाखा लागते त्यांच्या नसानसात संघाच्या माध्यमातून भाजपचं काम आहे. अशा कार्यक्रमाला तुम्ही आलाय आणि मी तुम्हाला त्याबाबतीत आग्रह न करणं हे यथोचित होणार नाही. त्यामुळे भाजपचा खासदार म्हणून तुम्हाला आग्रह करतो, असं संजयकाका पाटील म्हणाले.

मला बोलवणाऱ्यांनी स्वगृही यावं : अमित देशमुख

यावर अमित देशमुख म्हणाले की, "लातूरचा देशमुख वाडा कितीही वादळे आली आणि कितीही संकटे आली तरी आहे तिथेच राहणार आहे. मला बोलवणाऱ्यांनी स्वतः स्वगृही (काँग्रेसमध्ये) यावं. सध्या राज्यात शिवसेना-भाजपचे सरकार आहे, किंवा तसे तूर्त तरी म्हणावे लागत आहे. हे सरकार वैध की अवैध हे सर्वोच्य न्यायालयात सुनावणी साठी प्रलंबित आहे आणि आता कोर्ट सुरु होणार आहे. त्यामुळे सर्वांनी शांतता राखा असं म्हणत अमित देशमुख यांनी शिंदे-फडणवीस सरकारला टोला लगावला. आताची पाच वर्षे ही चमत्कारिकच राहिली. सध्या राज्यात हे तिसरे सरकार आहे. पहिले सरकार हे अडीच दिवसाचे होते. दुसरे सरकार हे अडीच वर्षाचे होते तर तिसरे  सरकार हे सध्या सत्तेत आहे आणि चौथे सरकार कधीही येऊ शकेल अशी परिस्थिती आहे. काहीही सांगता येत नाही. महाराष्ट्रात निवडणुका होतच नाहीत. निवडणुका कधी होतील हे ही सांगता येत नाही." 

VIDEO : Amit Deshmukh Full Speech : भाजपात जाण्याच्या चर्चेला काँग्रेसचे नेते अमित देशमुख यांचा पूर्णविराम

संबंधित बातमी

'कितीही संकटं आली तरी देशमुख वाडा आहे तिथेच राहणार'; भाजपमध्ये जाण्याच्या चर्चेवर अमित देशमुखांचं वक्तव्य

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Team India Victory Parade : विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक, हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दीAshish Shelar And Rohit Pawar : रोहित पवारांसाठी आशिष शेलार धावले; 'हिटमॅन'ला थांबवलं अन् फोटो काढलाRohit Sharma Meet Family : विजयानंतर रोहित शर्मा आईवडीलांना पहिल्यांदा भेटतो तेव्हा...Ajit Pawar Special Report : बजेटवरुन टीका; अजितदादांचं सडेतोड उत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget