Akola VidhanSabha : काँग्रेसने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी 7 उमेदवारांची घोषणा केली आहे. सोबतच अकोला पश्चिम विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवार जाहिर केला आहे. अकोला महापालिकेचे माजी विरोधी पक्ष नेता साजिद खान पठाण यांना काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. साजिद खान पठाण (Sajid Khan Pathan) हे आता काँग्रेसचे अकोला पश्चिम विधानसभा पोटनिवडणुकीत अधिकृत उमेदवार असणार आहेत. दरम्यान अकोला पश्चिम विधानसभा काँग्रेसचा परंपरागत मतदारसंघ आहे. दरम्यान काँग्रेसला लोकसभा जिंकायची असेल तर अकोला पश्चिम ठाकरे गटाला सोडा, असा दबावतंत्र ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुखांनी (Nitin Deshmukh) काँग्रेसवर टाकला होता. 


दरम्यान 26 एप्रिलला लोकसभेसोबतच अकोला पश्चिम विधानसभेसाठी पोटनिवडणूक होतीये. भाजप आमदार गोवर्धन शर्मांच्या निधनाने या जागेवर पोटनिवडणुक होणार आहे. 1995 ते 2023 निधनापर्यंत सलग सहावेळा गोवर्धन शर्मांनी अकोला पश्चिम मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं होतंय. दरम्यान देशभरात लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत अकोला पश्चिम विधानसभाची पोटनिवडणूक होत आहे. एकीकडे भाजपात या पोटनिवडणुकीच्या जागेच्या उमेदवारीवरून अंतर्गत कलह सुरू असतानाच आता काँग्रेसने आपला उमेदवार जाहीर केला आहे. अकोला महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्ष नेता साजिद खान पठाण हे आता काँग्रेसचे अधिकृत उमेदवार असणार आहेत. आता भाजप कोणाला संधी देते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. दरम्यान भाजपकडून दिवंगत गोवर्धन शर्मा यांच्या कुटुंबातील कृष्णा शर्मा, महानगराध्यक्ष विजय अग्रवाल यांच्यासह आणखी 16 जण शर्यतीत आहे. 


साजिद खान पठाण नेमके कोण आहेत? काय होतंय मागील निवडणुकीत या विधानसभेचं गणित?


सन् 2007 च्या महानगर पालिका निवडणुकीत काँग्रेसवर नगरसेवक म्हणून ते निवडून आले होते. त्यानंतर स्थायी समितीचे सभापती, तसेच अकोला महापालिकेत विरोधी पक्षनेता म्हणूनही त्यांनी कामकाज केले आहे. 2019 च्या निवडणुकीत त्यांना अकोला पश्चिम विधानसभा निवडणुकीत काँग्रेस कडून उमेदवारी जाहीर झाली होती. या निवडणुकीत निकालाच्या दिवशी सुरुवातीपासून काँग्रेसचे उमेदवार साजीद खान पठाण यांनी भाजप उमेदवार गोवर्धन शर्मा यांच्यावर आघाडी मिळविली होती. शेवटच्या क्षणापर्यंत कडवी झुंज साजीद खान यांनी शर्मा दिली होती. या दरम्यान 67 हजार 629 हजार मते साजीद खान यांना मिळाली. तर भाजप उमेदवार शर्मा यांचा अवघ्या 2 हजार 662 मतांनी निसटता विजय झाला होता. या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार साजीद खान पराभूत होऊनही विजयी ठरल्याची भावना अकोलेकरांनी व्यक्त केल्या होत्या. दरम्यान सहाव्यादा अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघावर दणदणीत विजयश्री प्राप्त करणाऱ्या गोवर्धन शर्मा यांना 2019 च्या निवडणुकीत काँग्रेसने कडवी झुंज दिली होती.


अकोला पश्चिम पोटनिनडणुकीत ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये 'मैत्रीपुर्ण' लढत!


अकोला पश्चिम विधानसभा पोटनिवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटानं आपला उमेदवार जाहीर केला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे गटनेते राजेश मिश्रांची उमेदवारी पक्षाने जाहीर केली आहे. आमदार नितीन देशमुखांनी एक जाहीर कार्यक्रम घेत मिश्रांची उमेदवारी जाहीर केली. पक्षातील वरिष़्ठांची परवानगी घेऊनच ही उमेदवारी जाहीर केल्याचं आमदार नितीन देशमुख म्हणालेत. यामूळे अकोल्यात महाविकास आघाडीत बिघाडीची शक्यता निर्माण झाली आहे. अकोला पश्चिम हा काँग्रेसचा परंपरागत मतदारसंघ आहेय. 2019 मध्ये अकोला पश्चिममध्ये काँग्रेस उमेदवाराचा अवघ्या 2600 मतांनी पराभव झाला होता. काँग्रेसला लोकसभा जिंकायची असेल तर अकोला पश्चिम ठाकरे गटाला सोडा, असं म्हणत ठाकरे गटाने काँग्रेसवर दबावतंत्राचा वापर केल्याचं बोललं जात आहे.


इतर महत्वाच्या बातम्या


Praniti Shinde: आंदोलकांनी गाडी घेरली, प्रणिती शिंदेंचा रौद्रावतार, म्हणाल्या, एsss गाडीला हात लावायचा नाय!