Solapur and Kolhapur Loksabha  : लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election 2024) काँग्रेस उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. दुसऱ्या यादीतून महाराष्ट्रातील 7 उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील उमेदवारांची ही पहिलीच यादी आहे. कोल्हापुरातून शाहू महाराज छत्रपती (Shahu Maharaj) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर सोलापुरातून आमदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.   "मी पक्षाचे आभार मानते. ही लोकशाहीसाठीची लढाई आहे", अशी प्रतिक्रिया उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आमदार प्रणिती शिंदे यांनी दिली आहे. 


काँग्रेसचे महाराष्ट्रातील 7 उमेदवार कोणते ?


नंदुरबार -गोवल के पाडवी
अमरावती -बलवंत वानखेडे
नांदेड  - वसंतराव चव्हाण
पुणे - रवींद्र धनगेकर
लातूर - शिवाजीराव काळगे
सोलापूर प्रणिती शिंदे
कोल्हापूर - शाहू महाराज छत्रपती


प्रणिती शिंदेंची कारकिर्द 


माजी केंद्रीय गृहमंत्री, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या


प्रणिती शिंदे ह्या सोलापूर मध्य विधानसभा मतदारसंघाच्या सलग तीन वेळा आमदार राहिल्या


2009 साली पहिल्यांदा तत्कालीन आमदार नरसय्या आडम यांचा पराभव करून विधानसभेत दाखल झाल्या. 


त्यानंतर 2014, 2019 या निवडणुकीत ही प्रणिती शिंदेचा विजय


त्यापूर्वी जाई-जुई विचार मंचच्या माध्यमातून सामाजिक कार्यात सक्रिय होत्या


सध्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या कार्याध्यक्ष आणि काँग्रेसच्या CWC च्या निमंत्रीत सदस्य 


पुण्यातून रवींद्र धंगेकर विरुद्ध मुरलीधर मोहोळ लढत होणार 


काही दिवसांपूर्वीच माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी प्रणितीला दिल्लीत पाठवा. सोलापूरचे नाव पुन्हा एकदा देश पातळीवर गाजवू द्या, असं आवाहन केलं होतं. त्यानंतर आता काँग्रेस पक्षाने त्यांना उमेदवारी जाहीर केली आहे. भाजपकडून सोलापूरचा उमेदवार अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही.  शिवाय कोल्हापुरातूनही अद्याप भाजपकडून कोणाला उमेदवारी मिळणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. शाहू महाराज कोणाकडून लढणार यावरुन महाविकास आघाडीमध्ये बऱ्याच दिवसांपासून खल सुरु होता. मात्र, आज अखेर ते काँग्रेसच्या हात या चिन्हावर लढणार आहेत, हे निश्चित झाले आहे.  दरम्यान, पुण्यातून रवींद्र धंगेकर विरुद्ध मुरलीधर मोहोळ अशी लढत होणार हे निश्चित झाले आहे. 


 






इतर महत्वाच्या बातम्या 


उद्धव ठाकरे यांच्याकडून डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना सांगली लोकसभेची उमेदवारी जाहीर