Rohit Pawar on Jitendra Awhad : "विशाळगडावर घडलेल्या घटनेच्या मागे भाजपा होती.  त्यांच्या संघटनेच्या काही कार्यकर्त्यांनी तेथे येऊन धुडगूस घातला म्हणून महाराष्ट्रात सातत्याने वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न सत्तेतल्या लोकांकडून करण्यात येतो. याबाबत जितेंद्र आव्हाड यांची गाडी फोडली याचा निषेध मी करतो. मात्र कुठल्याही पक्षाच्या नेत्यांबद्दल बोलतांना सांभाळून बोललं पाहिजे. ते मोठे नेते असले तरी मी व्यक्तिगत नागरीक म्हणून इच्छा व्यक्त करतो की सगळ्यांनी काळजी घेण्याची गरज आहे. आव्हाड साहेब पुरोगामी विचारासाठी लढत आहेत मात्र बोलताना काळजी घेतली पाहिजे", असं म्हणत राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांना घरचा आहेर दिलाय. 


शहानिशा झाली पाहिजे जर काहीच केलं नसेल तर मग आम्ही दिलगिरी व्यक्त करू


रोहित पवार म्हणाले, अजितदादा दिल्लीला गेल्यानंतर काही चॅनेलला प्रतिक्रिया देताना गॉगल, टोपी आणि मास्क लावून गेल्यानंतर आसपासच्या लोकांना देखील माहित नव्हते की मी तिथे आहे. हे कोणालाच कळलं नाही असं म्हटले. हे लोकांसमोर आलं पाहिजे. अनौपचारिक चर्चा करताना अजित पवार बोलले. मग ते पत्रकारांशी असे बोललेच नाही का? की पत्रकार खोटे बोलले?  याची शहानिशा झाली पाहिजे जर काहीच केलं नसेल तर मग आम्ही दिलगिरी व्यक्त करू, असेही रोहित पवार यांनी म्हटलं आहे.


पवार साहेबांचा इतिहास पाहिला तर महाराष्ट्राचा विकास हा त्यांच्या काळातच झालेला 


वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडी सोबत यावे अशी साद महाविकास आघाडीचे आमदार रोहित पवार यांनी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांना घातली होती. मात्र यावर प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया देताना रोहित पवार यांनी आपल्या आजोबांचा इतिहास तपासावा असा खोचक सल्ला दिला होता. यावर आता रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली असून प्रकाश आंबेडकर कोणता इतिहास सांगतात?  ते मला माहित नाही. मात्र पवार साहेबांचा इतिहास पाहिला तर महाराष्ट्राचा विकास हा त्यांच्या काळातच झालेला आम्ही पाहिलेला आहे. भेदभाव त्यांनी कधी केला नाही. विकास करत असताना केंद्र सरकारकडूनही मोठा निधी शरद पवार यांनी आणला आहे. आता शरद पवारांच्या कुठल्या कामाकडे पहा असे प्रकाश आंबेडकर सांगत आहेत हे मला सांगता येत नाही. मात्र महाराष्ट्रात सर्व जातीपातीच्या लोकांना एकत्र घेत भेदभाव न करता जो विकास केला तो आम्ही पाहिला आहे. 


प्रकाश आंबेडकर साहेबांना एक नागरिक म्हणून विनंती केली होती आत्तापर्यंत ज्या ज्या निवडणुका झालेल्या आहेत त्यावेळेस वंचित बहुजन आघाडी कडून जे उमेदवार उभे राहिले होते. त्या उमेदवारांकडून जे मतदान त्यांना पडले ते दुर्दैवाने भाजप विरुद्ध असलेल्या पक्षाचीच मते त्यांनी घेतली आहेत. मात्र आता कुठेतरी संविधान टिकवायचे असेल तर बीजेपीच्या विरोधात आपल्याला लढायचं असेल तर आता लोकसभेची संधी गेलेली आहे. मात्र विधानसभेला शरद पवार आणि इतर महाविकास आघाडीतील नेते निर्णय घेतील. मात्र प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष कुठेही भाजपला मदत होणार नाही, अशी भूमिका घेणे गरजेचे असल्याचे आमदार रोहित पवार यांनी यावेळी सांगितलं आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Nilesh Lanke on Ram Shinde : पवारांचा नाद करू नका अन्यथा तुमचं राजकीय नुकसान करून घ्याल, निलेश लंकेंचा कर्जत जामखेडमधून राम शिंदेंना इशारा